अमोल कोल्हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, कोणत्या वाहिनीवर दिसणार मालिका

डॉ. अमोल कोल्हे अभिनेते आणि राजकीय नेते आहेत. सध्या ते एका पक्षाचे खासदार आहेत. त्यांची स्टारप्रवाहवरील राजा शिव छत्रपती लोकांना अधिक आवडली होती.

अमोल कोल्हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, कोणत्या वाहिनीवर दिसणार मालिका
अमेल कोल्हे (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 9:02 AM

मुंबई – आजपर्यंत डॉ. अमोल कोल्हेंनी (amol kolhe) अनेक ऐतिहासिक मालिकेमध्ये काम केल्याचे पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांच्या मालिकांनी लोकांच्या मनावर देखील राज्य केलं आहे. त्यामुळं त्यांच्या येणा-या नव्या मालिकेची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. कारण त्यांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची (shivaji maharaj) भूमिका साकारली असल्याची पोस्ट सोशल मीडियावर (social media) शेअर केली आहे. त्यामुळे त्यांनी ही मालिक कशी असेल, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आत्तापर्यंत अमोल कोल्हे यांनी अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांच्या भूमिका देखील लोकांच्या पसंतीला अधिक उतरल्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपट देखील केले आहेत. त्याचबरोबर त्यांची राजकीय कारर्कीद सुध्दा यशस्वी झालेली आपण पाहिली आहे. ते सध्या एका पक्षाचे खासदार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

पोस्टमध्ये काय लिहिलंय

अमोल कोल्हे यांनी काल एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की योग आला पुन्हा ते गारूड अनुभवण्याचा, पुन्हा नतमस्तक होण्याचा, पुन्हा पडद्यावर “महाराज” साकारण्याचा! असं त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याचबरोबर स्वराज्य सौदामिनी ताराराणी.. सोमवार ते शनिवार ७.३० वाजता सोनी मराठीवर असंही लिहिलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांना त्यांची नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना आनंद झाला आहे. काल ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तर त्यात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे, असेही प्रश्न विचारले आहेत. त्यामुळं चाहत्यांना सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरचं पाहायला मिळणार आहे.

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका ताराराणीच्या जीवनावर भाष्य करणारी

डॉ. अमोल कोल्हे अभिनेते आणि राजकीय नेते आहेत. सध्या ते एका पक्षाचे खासदार आहेत. त्यांची स्टारप्रवाहवरील राजा शिव छत्रपती लोकांना अधिक आवडली होती. तसेच त्यांनतर अमोल कोल्हेच्या प्रसिध्दीत अधिक भर पडली असल्याचे पाहायला मिळाले. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका ताराराणीच्या जीवनावर भाष्य करणारी आहे. त्यामुळे ही मालिका देखील लोकांना अधिक आवडेल असं वाटतंय. कारण याच्या आगोदर महाराजांच्या केलेल्या भूमिका अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांना अधिक आवडल्या होत्या, त्यामुळं ही मालिका देखील लोकांना आवडेल. सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे.

रसिका सुनिलचा लेट पण थेट व्हॅलेंटाईन डे!, फोटो शेअर करत म्हणाली…

देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, अमृता फडणवीसांची किचनमध्ये ‘कल्ला’कारी

Aai Kuthe Kay Karte : घरच्यांनी घेतला अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय, अरुंधती घेणार मोठा निर्णय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.