Sara Ali Khan: ‘माझ्या मुलीपासून लांब राहा…’, अमृता सिंग आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यामधील कडाक्याचे भांडण
Sara Ali Khan - Sushant Singh Rajput: सुशांतसोबत साराच्या नात्याला आईचा विरोध, साराने सुशांतसाठी सोडलं होतं आईचं घर, पण त्यानंतर..., सुशांत आणि साराच्या नात्याबद्दल आणखी एक सत्य समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा...
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज जगात नाही. पण त्याच्याबद्दल अनेक चर्चा आजही चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगत असतात. सुशांत याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेत्याच्या नावाची चर्चा झाली. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबत सुशांतचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. टीव्ही विश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्याने बॉलिवूडच्या दिशेने स्वतःचा मोर्चा वळवला. बॉलिवूडमध्ये देखील सुशांतने स्वतःची ओळख निर्माण केली. दरम्यान, ‘केदारनाथ’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना सुशांतचं अभिनेत्री सारा अली खान याच्यासोबत जोडू जाऊ लागलं.
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील कधीच सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला नाही. पण सुशांत आणि सारा कायम गुपचूप भेटायचे असं देखील अनेकदा समोर आलं. दरम्यान 2019 मध्ये एक दावा करण्यात आला होता की, सारा आणि सुशांत यांच्या नात्याला आई अमृता सिंग हिचा विरोध होता.
आईला सुशांत याच्यासोबत असलेलं नातं मान्य नसल्यामुळे सारा हिने आईचं घर सोडून नवीन फ्लॅट खरेदी केला होता… अशी देखील चर्चा रंगली होती. रिपोर्टनुसार, अमृता सिंग हिला सुशांत बिलकूल आवडत नव्हता. ‘केदारनाथ’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये कडाक्याचं भांडण देखील झालं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृता सिंग हिने सुशांतला ‘माझ्या मुलीपासून लांब राह. स्वतःला जास्त ओव्हर स्मार्ट समजण्याची गरज नाही…’ असं सांगितलं होतं. जेव्हा अमृताला सारा आणि सुशांत यांच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा सारा हिला देखील आईने बजावलं होतं. ‘कधीच कोणत्या अभिनेत्याला डेट करायचं नाही…’ असा सल्ला अमृता हिने लेक साराला दिला होता.
आईचा विरोध असल्यामुळे सारा देखील सुशांतपासून दूर झाली. पण आजही सारा, सुशांतच्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. सांगायचं झालं तर, सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्स केसमध्ये साराची देखील NCB कडून चौकशी करण्यात आली होती. तेव्हा सुशांतसोबत असलेलं नातं साराने कबूल केलं होतं. पण सुशांत निष्ठावंत नव्हता म्हणून ब्रेकअप झालं असं देखील सारा म्हणाली होती.
सुशांत सिंह राजपूत याचं निधन
अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं होतं. पण 14 जून 2020 मध्ये अभिनेत्याने वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःलं संपवलं. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. सुशांत सिंह राजपूत केस प्रकरणी अनेक सेलिब्रिटींची चौकशी देखील करण्यात आली. पण अभिनेत्याच्या मृत्यूच्या 4 वर्षानंतर देखील मृत्यूचं ठोस कारण समोर आलेलं नाही.