Marriage Life | आईला सतावते लेकीच्या लग्नाची चिंता, अमृता सिंग म्हणाली, ‘साराने माझ्यासारखं केलं तर…’,

Marriage Life | अमृता सिंग हिला सतावतेय लेकीच्या लग्नाची चर्चा; 'माझ्यासोबत जे झालं ते...', असं म्हणाली अमृता सिंग? अमृता सिंग आणि सारा अली खान यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठी चर्चा... लेकीच्या लग्नाबद्दल असं का म्हणाली अमृता सिंग?

Marriage Life | आईला सतावते लेकीच्या लग्नाची चिंता, अमृता सिंग म्हणाली, 'साराने माझ्यासारखं केलं तर...',
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 2:37 PM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सारा हिने आई अमृता सिंग हिच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळं आणि भक्कम स्थान निर्माण केलं आहे. सारा तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. झगमगत्या विश्वात अनेक सिनेमांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारत असताना सारा हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याही नात्यावर सारा हिने अधिकृत वक्तव्य केलं नाही. एवढंच नाही तर, अमृता सिंग देखील सारा हिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते.

एका मुलाखतीत अमृता सिंग हिने सारा अली खान हिच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. आपल्या मुलीच्या आयुष्यात सर्वकाही उत्तम आणि लेक सुखी असावी असं प्रत्येक आईला वाटतं. अमृता सिंग हिला देखील सारा हिच्या लग्नाची चिंता सतावते. एवढंच नाही तर मी केलं तसं सारा हिने करू नये असं देखील अमृता म्हणाली.

सारा हिने गुपचूप लग्न करू नये अशी अमृता सिंग हिची इच्छा आहे. ‘जर सारा हिने माझ्यासारखं गुपचूप लग्न केलं तर, मी साराच्या कानशिलात लगावेल..’ असं वक्तव्य अमृता सिंग यांनी एक मुलाखतीत केलं होतं. सारा आणि अमृता यांच्यामध्ये एका मैत्रीणी सारखं नातं आहे. त्यामुळे साराने तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगावी अशी अमृता सिंग हिची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचं लग्न

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांनी गुपचूप लग्न केलं होतं. कुटुंबियांना कोणतीही कल्पना न देता अमृता आणि सैफ यांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न अधिक काळ टिकलं नाही. लग्नाच्या १३ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. १९९१ मध्ये अमृता आणि सैफ यांनी लग्न केलं आणि २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

सैफ अली खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अमृता हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. तर सैफ अली खान याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न करत दुसऱ्या संसाराला सुरुवात केली. सैफ आणि करीना त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत.

सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या वयात देखील फार अंतर आहे. वयाच्या अंतरावरून फार ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावर करीना आणि सैफ यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. करीना आणि सैफ यांना तैमूर आणि जेह अशी दोन मुलं आहेत.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.