अमृता फडणवीस यांनी दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकाराल? त्यांचा ‘हा’ व्हिडीओ नक्की पाहा
‘आज मै मूड बणा लेया’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी दिलं challenge; त्यांनी दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकाराल?
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या गाण्याची चर्चा आहे. ६ जानेवारीला अमृता फडणवीस यांचं ‘आज मै मूड बणा लेया’ गाणं प्रदर्शित झालं. गाणं प्रदर्शित होताच काही क्षणात लोकप्रिय झालं. सर्वत्र त्यांच्या गाण्याची चर्चा सुरु असताना, अमृता फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द अमृता फजणवीसांनी व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट केला आहे. अमृता फडणवीस व्हिडीओमध्ये ‘आज मै मूड बणा लेया’ गाण्यावर हुकअप स्टेप करताना दिसत आहेत.
व्हिडीओ पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी चाहत्यांना एक challenge दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी ‘आज मै मूड बणा लेया’ गाण्यावर हुकअप स्टेपवर रिल बनवण्यासाठी चाहत्यांना सांगितलं आहे. शिवाय व्हिडीओ बनवल्यानंतर त्यांनी गाण्याचे हॅशटॅग देखील वापरण्यास सांगितलं आहे. तर तुम्ही अमृता फडणवीस यांनी दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकाराल? त्यांचा व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
सध्या सर्वत्र अमृता फडणवीस यांच्या ‘आज मै मूड बणा लेया’ गाण्याची चर्चा आहे. अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र त्यांना गायनाची प्रचंड आवड आहे. याआधीही त्यांचे म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अमृता यांच्या या नव्या गाण्याची निर्मिती टी-सीरिज या ब्रँडने केली आहे. या गाण्याचे बोल, अमृता यांचा डान्स यासोबतच म्युझिक व्हिडीओतील त्यांचा ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना आवडला आहे.
अमृता फडणवीस अनोखी फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे त्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे नवीन गाणंसुद्धा हिट ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
अमृता फडणवीस यांची याआधी देखील आनेक गाणी प्रदर्शित झाले आहेत. बँकर असलेल्या अमृता कायम गायनाच्या माध्यमातून स्वतःची आवड जोपासताना दिसतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या गाण्यांची चर्चा कायम रंगलेली असते.