अनंत अंबानींचा संगीत सोहळा, अमृता फडणवीस आणि लेक दिविजा यांचा खास लूक, व्हिडीओ व्हायरल

Anant Ambani's pre-wedding Sangeet : अनंत-राधिका यांच्या संगीत सोहळ्यासाठी लेकीसोबत पोहोचल्या अमृता फडणवीस, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल..., संगीत सोहळ्यात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींना लावली हजेरी...

अनंत अंबानींचा संगीत सोहळा, अमृता फडणवीस आणि लेक दिविजा यांचा खास लूक, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 9:23 AM

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सांगायचं झालं तर, भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अंबानी कुटुंब चर्चेत आहे. 12 जुलै रोजी मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. अनंत – राधिका यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा संपन्न झाला.

संगीत सोहळ्यात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. पण सर्वांच्या नजरा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा फडणवीस यांच्यावर येऊन थांबल्या. सोशल मीडियावर अमृता फडणवीस आणि दिविजा यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस यांनी हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. तर दिविजा हिने काळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. दोघींनी जवळपास सारखेच ड्रेस घातले होते व लूकही सारखाच केला होता. दोघीही पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील दोघींचा लूक प्रचंड आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

सांगायचं झालं तर, अमृता फडणवीस आणि दिविजा यांनी अनंत- राधिकाच्या पहिल्या प्री- वेडिंग सोहळ्यालाही हजेरी लावली होती. जामनगर येथील देखील दोघींचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात दोघींनी हजेरी लावली.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, हॉलिवूड गायक जस्टिन बिबर याने देखील संगीत सोहळ्यात परफॉर्म केलं. ज्यासाठी गायकाने तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न 12 जुलै रोजी मोठ्या थाटात होणार आहे. दुपारी 3 वाजता शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर 13 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. एवढंच नाही तर, अंबाना कुटुंबियांनी रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं आहे. 14 जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे. ज्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात येणार आहे.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.