Amruta Fadnavis on Uorfi Javed : मॉडेल उर्फी जावेद (Uorfi Javed) कायम तिच्या तोकड्या कपड्यांमधील फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत उर्फी चर्चेत असते. पण आता तोकडे कपडे घालून फोटो पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप नोंदवला आहे. शिवाय चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अटकेची देखील मागणी केली आहे. एक ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही? असं म्हणत चित्रा वाघ ऊर्फीच्या अटकेची मागणी केली होती. त्यांच्या ट्विटवर उर्फीने देखील चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिलं. (chitra wagh)
आता उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उडी घेतली आहे. उर्फी जे करत आहे, त्यात काही वावगं नाही… अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. ‘आज मै मूड बना लिया’ गाण्याच्या कार्यक्रमात त्यांनी सुरु असणाऱ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘चित्रा वाघ त्यांचे विचार मांडत म्हणाल्या, कलाकारांना सिनेमात एखादा सिन देण्यासाठी काही विशिष्ट कपडे घालवावे लागतात, पण तुम्ही प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसं फिरत असाल, तर ते योग्य नाहीये. पण जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी असतो तेव्हा संस्कृतीचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कलाकाराचं प्रोफेशन आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं.’
पुढे अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘चित्रा वाघ यांनी उर्फीबाबत त्यांचे विचार मांडले आणि आता त्या त्यानुसार कारवाई करत आहेत. मला असं वाटतं, ज्याठिकाणी गरज नाही, तिकडे तिने संस्कृती जपली पाहिले. वैयक्तिक सांगायचं झालं, तर उर्फी देखील स्त्री आहे. ती जे करते ते स्वतःसाठी करते, त्याम मला काही वावगं वाटत नाही.’ असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.
अनेकांकडून होत असलेल्या टीकेनंतर देखील उर्फी जावेद तोकडे कपडे घालण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे उर्फीला धडा शिकवण्यावर चित्रा वाघ ठाम आहेत. त्यामुळं उर्फीचं हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हेच पाहावं लागेल.