Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिव तांडव स्त्रोत्रम् म्हणजे भक्ती, अध्यात्म आणि देवत्व; अमृता फडणवीसांच्या गाण्याची चाहत्यांना उत्सुकता

या शिव तांडव स्त्रोत्रमची पोस्ट त्यांनी ज्यावेळी शेअर केली त्यावेळेपासून रसिकांना आणि शिवभक्तांना त्याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे या शिव तांडव स्त्रोत्रमचे गाणे रिलीज होण्याची वाट सगळेच बघत आहेत, आणि अमृता फडणवीसांना शुभेच्छाही देत आहेत.

शिव तांडव स्त्रोत्रम् म्हणजे भक्ती, अध्यात्म आणि देवत्व; अमृता फडणवीसांच्या गाण्याची चाहत्यांना उत्सुकता
shiv tandav strotram amruta fadnavis
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 1:58 AM

मुंबईः अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) यांची आता वेगळी ओळख करुन द्यायची गरज राहिली नाही. अमृता फडणवीस यांना काय म्हणायचे आहे काय बोलायचे आहे ते सरळ त्यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सांगत असतातच. अमृता फडणवीस यांनी मंगळवारीच सोशल मीडियावरुन सांगितले होतं की, शिव तांडव स्त्रोत्र या गाण्याचा अल्बम (Album) गुरुवारी 24 रिलीज होत आहे, त्या अल्बमचे त्यांनी पोस्टर ट्विटर आणि फेसबुकवरूनही शेअर केलं होते. त्याच शिव तांडव स्त्रोत्रम या गाण्याचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे आणि त्यांनी सांगितले आहे की, उद्या हे गाणं तुमच्या भेटीला येत आहे. या गाण्याचा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे गीत म्हणजे सर्व शिवभक्तांसाठी भक्ती, शुद्ध अध्यात्म, देवत्व यांचे परम असे म्हणून त्यांनी त्यांच्या या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अमृता फडणवीस या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्या तरी त्यांनी आपल्या गीत गायनाची आवड स्वतंत्रपणे जपली आहे. त्यांची ज्या प्रकारची गाणी प्रसिद्ध झाली आहेत, ती एकाच प्रकारची नसून वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यांनी ही आपली आवड जोपासत असताना वेगवेगळ्या संगीतकार, छायाचित्रणकार यांच्यासोबत काम केले आहे. शिव तांडव स्त्रोत्रम या त्यांच्या गाण्याची व्हिडिओ निर्मिती केली आहे ती नटरंग चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी तर संगीत दिग्दर्शन केले आहे विजय दाणी यांनी त्यामुळे या गाण्यातील काहीसा भाग जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आला असला तरी अमृता फडणवीस यांचे ते गाणे असल्याने त्यांच्या चाहत्यांना शिव तांडव स्त्रोत्रमची उत्सुकता लागून राहिली आहे.

अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहत असतात. कधी राजकीय टिप्पणी असते तर कधी त्यांच्या सांगितिक प्रवासातील वेगवेगळ्या घटनांचे संदर्भ देत असतात. या शिव तांडव स्त्रोत्रमची पोस्ट त्यांनी ज्यावेळी शेअर केली त्यावेळेपासून रसिकांना आणि शिवभक्तांना त्याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे या शिव तांडव स्त्रोत्रमचे गाणे रिलीज होण्याची वाट सगळेच बघत आहेत, आणि अमृता फडणवीसांना शुभेच्छाही देत आहेत.

संबंधित बातम्या

अखेर ‘गंगुबाई काठियावाडी’चा विजय; हायकोर्टाने फेटाळल्या चित्रपटाविरोधातील याचिका

Jhund Trailer: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!

‘इथे मीच गुरू, मीच शिष्य..’; ‘चाबुक’ चित्रपटात समीर धर्माधिकारी अनोख्या भूमिकेत

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.