Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“त्याने मासिक पाळीची तारीख विचारली कारण..”; अमृता सुभाषने सांगितला इंटिमेट सीन शूटिंग करतानाचा अनुभव

या चित्रपटानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृता इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल व्यक्त झाली. इंटिमेट सीन शूट करताना दिग्दर्शक आणि दिग्दर्शिकेचा दृष्टीकोन वेगळा असतो का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

त्याने मासिक पाळीची तारीख विचारली कारण..; अमृता सुभाषने सांगितला इंटिमेट सीन शूटिंग करतानाचा अनुभव
Amruta SubhashImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 11:56 AM

मुंबई : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘लस्ट स्टोरीज 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात चार विविध दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चार कथा दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील एका कथेचं दिग्दर्शन कोंकना सेन शर्माने केलं आहे. ज्यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने भूमिका साकारली आहे. या चित्रपटानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृता इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल व्यक्त झाली. इंटिमेट सीन शूट करताना दिग्दर्शक आणि दिग्दर्शिकेचा दृष्टीकोन वेगळा असतो का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अमृताने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबतचा एक किस्सा सांगितला. अमृताचा पहिला इंटिमेट सीन अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता. या शूटिंगविषयी तो अत्यंत संवेदनशील असल्याचं तिने सांगितलं.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनच्या शूटिंगदरम्यान अनुरागने त्याच्या डायरेक्शन टीमला बोलावलं होतं आणि त्यांनी अमृताशी आधी सविस्तर चर्चा केली होती. यावेळी अनुरागने अमृताच्या मासिक पाळीच्या तारखेनुसार शूटिंग शेड्युल ठरवण्याच्या सूचना टीमला दिल्या होत्या. जेणेकरून इंटिमेट सीन शूट करताना अमृता कम्फर्टेबल राहू शकेल. याविषयी ती म्हणाली, “मी माझा पहिला सेक्स सीन अनुरागसोबत ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये केला होता. तिथे पुरुष किंवा महिला दिग्दर्शकाचा प्रश्नच नव्हता. कारण तो खूप संवेदनशील होता. त्याने त्याच्या टीमला बोलावलं होतं. माझ्या मासिक पाळीची तारीख त्याने विचारली जेणेकरून त्यादरम्यान शूटिंग शेड्युल ठेवता येणार नाही.”

हे सुद्धा वाचा

संवेदनशील वागणुकीबद्दल बोलताना पुरुष किंवा स्त्रीचा वेगळा विचार करू नये असंही तिने स्पष्ट केलं. “हा पुरुष किंवा स्त्रीयांच्या पलीकडचा विषय आहे. तो खरंच संवेदनशील होता,” असं ती पुढे म्हणाली. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये अमृताने रॉ एंजटची भूमिका साकारली होती.

‘लस्ट स्टोरीज’चा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या. त्यात अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर यांचा समावेश होता. स्त्रियांच्या कामुक भावनेबद्दलच्या विविथ कथा यात आधुनिक दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या होत्या. आता दुसऱ्या भागातील चार कथांचं दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि सुजॉय घोष यांनी केल्या आहेत.

वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.