Anant-Radhika यांच्या साखरपुड्यात श्वानकडे होती महत्त्वाची जबाबदारी

देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण ; राधिका - अनंत यांच्या साखपुड्यात श्वानाची महत्त्वाची जबाबदारी; नीता आणि मुकेश अंबानी यांचा डान्स पाहून पाहूणे थक्क

Anant-Radhika यांच्या साखरपुड्यात श्वानकडे होती महत्त्वाची जबाबदारी
Anant-Radhika यांच्या साखरपुड्यात श्वानकडे होती महत्त्वाची जबाबदारी
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 1:50 PM

Anant Ambani – Radhika Merchant : देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे लहान पूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा नुकताच मोठ्या थाटात मेहंदी सोहळा पार पाडला. मेहंदी सोहळ्यानंतर राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्यात अनेक बॉलिवूडकरांनी देखील हजेरी लावली. सध्या राधिका आणि अनंत यांच्या साखपुड्यातील इनसाईड व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये ईशा अंबानी लहान भावाच्या साखरपुड्याची घोषणा करतात. साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर त्यांचा श्वान राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याची आंगठी घेवून येतो. त्यानंतर दोघे एकमेकांना आंगठी घालतात. अशा प्रकारे राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्यात पाळीव कुत्र्याने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

साखरपुडा झाल्यानंतर अंबानी कुटुंबाचे सदस्य एक सरप्राईज डान्स देखील सादर करतात. महत्वाचं म्हणजे नीता आणि मुकेश अंबानी यांचा डान्स उपस्थित असलेल्या पाहुण्यांना थक्क करणारा आहे. संपूर्ण कुटुंब आनंद साजरा करत असताना राधिका देखील स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.

कोण आहे राधिका मर्चंट राधिका प्रसिद्ध उद्योगपती विरेन मर्चंट यांची कन्या आहे. राधिकाने परदेशातून पॉलिटिकल आणि इकोनॉमिक्स या विषयांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फॅमिली बिझनेस सांभाळत आहे. राधिका एनकोर हेल्थकेयरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सामिल आहे. राधिकाच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर राधिका यांच्याकडे जवळपास १० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

राधिकाच्या वडिलांकडे जवळपास ७५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. राधिकाचे वडील विरेन मर्चंट देखील भारतातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अंबानी कुटुंबाची सून झाल्यानंतर राधिकाच्या संपत्तीत आणखी वाढ होईल. वडिलांच्या संपत्तीची राधिका एकटी वारसदार आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.