कचोरी, कुल्फी, टिक्की-चाट… अंबानींच्या लग्नात अनेक चविष्ट पदार्थ; तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: राधिका मर्चंट - अनंत अंबानी यांच्या लग्नाचा शाही थाट... पाहुण्यासाठी अनेक चविष्ट पदार्थ, पदार्थांची नावे ऐकून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका - अनंत यांच्या लग्नाची चर्चा...

कचोरी, कुल्फी, टिक्की-चाट... अंबानींच्या लग्नात अनेक चविष्ट पदार्थ; तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 10:44 AM

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलहा अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. सोशल मीडियावर देखील लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. राधिका – अनंत यांच्या लग्नासाठी परदेशी पाहुणे देखील भारतात पोहोचत आहेत. त्यांच्यासाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अनंत – राधिका यांच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु होत्या. संगीत, हळदी आणि मेहंदी कार्यक्रमात सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती.

सोशल मीडियावर अंबानी कुटुंबियांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असताना, लग्नात असलेल्या काही पदार्थांची नावे समोर आली आहेत. यामध्ये चाट पासून कचोरीपर्यंत अनेक पदार्थांचा समावेश आहे. अंबानींच्या या लग्नात वाराणसी येथील प्रसिद्ध काशी चाट भंडार की चाट देखील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अनंत – राधिका यांच्या लग्नात ठेवण्यात आलेल्या पदार्थांमध्ये टिक्की, टमाटर चाट, पालक चाट, चणा कचोरी आणि कुल्फी देखील असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, नीता अंबानी गेल्या महिन्यात वाराणसी याठिकाणी गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी मेन्यू फायनल केल्याची माहिती मिळत आहे. लग्नात 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय शेफ 2500 पदार्थ तयार करणार असल्याची माहिती मिळत आहे.

अनंत – राधिका यांचं लग्न

12 जुलै रोजी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत आणि राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. दुपारी 3.00 वाजता अनंत – राधिका यांची मिरवणूक एकत्र येईल. राधिका आणि अनंत 600 डान्सर्ससोबत डान्स करणार आहे. लग्नाच्या विधी रात्री आठ वाजता होणार आहेत.

अनंत – राधिका यांच्या डान्सबद्दल सांगायचं झालं तर, कोरियोग्राफर वैभवी मर्चंट हिने डान्स कोरियोग्राफ केलाआहे. तर लग्नाच्या कपड्यांबद्दल सांगायचं झालं तर, सगळे आऊटफिट्स सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा याने डिझाईन केले आहेत. शिवाय सुरक्षेती देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांचं पूर्ण कुटुंब Z प्लस सुरक्षेत असणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.