‘अनन्या पांडे हिच्यासोबत इंटिमेट सीन प्रचंड…’, ‘हा’ अभिनेता असं का म्हणाला?
ananya panday : सिनेमात अनन्या पांडे हिच्यासोबत इंटिमेट सीन.. अभिनेता म्हणाला, 'तिच्यासोबत इंटिमेट सीन प्रचंड...', अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी याच्यासोबत देखील अनन्या पांडे हिने इंटिमेट सीन दिले आहे. पण 'खो गए हम कहां' सिनेमातील अभिनेता म्हणाला...
मुंबई | 13 जानेवारी 2024 : अभिनेत्री अनन्या पांडे कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री ‘खो गए हम कहां’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अनन्या पांडे हिने अभिनेता रोहन गुरबक्सानी याच्यासोबत इंटिमेट सीन दिले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनन्या पांडे स्टारर ‘खो गए हम कहां’ सिनेमा आणि सिनेमात अभिनेत्रीने दिलेल्या इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रोहन याने अनन्या पांडे हिच्यासोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर मोठा खुलासा केला आहे.
अनन्या पांडे हिच्यासोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर रोहन गुरबक्सानी म्हणाला, ‘अनन्या पांडे हिच्यासोबत इंटिमेट सीन शूट करताना मनावर कोणतंही दडपण नव्हतं. मी जे काही सांगत आहे, ते लोकांना विचित्र वाटेल, पण सीन शूट करणं स्मूद आणि कंफर्टेबल होतं…’ सध्या सर्वत्र रोहन याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
‘खो गए हम कहां’ सिनेमात अनन्या पांडे, रोहन गुरबक्सानी यांच्यासोबतट, आदर्श गौरव, सिद्धार्थ चतुर्वेदी, कल्की केल्का यांनी देखील मुख्य भू्मिका साकारली आहे. ‘खो गए हम कहां’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमा मैत्री, रिलेशनशिप इत्यादी गोष्टींवर आधारलेला आहे.
अनन्या पांडे हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही महिन्यांपासून अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखली करण्यात आलं. सोशल मीडियावर दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होत असतात. पण दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे अनेक जण दोघांना ट्रोल देखील करत असतात.
अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अनन्या पांडे सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अनन्या पांडे हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
अनन्या पांडे हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘खो गए हम कहां’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्री ‘ड्रिम गर्ल 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. ‘गहराईया’ सिनेमात अनन्या हिने अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी याच्यासोबत देखील इंटिमेट सीन दिले होते. आता अभिनेत्री ‘खो गए हम कहां’ सिनेमामुळे चर्चेत आहे.