‘पतीचं निधन होईल तेव्हा लाल साडी नेस’; अलाना पांडेच्या लग्नाचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

अनन्याची बहीण अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यावर तिने दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

'पतीचं निधन होईल तेव्हा लाल साडी नेस'; अलाना पांडेच्या लग्नाचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेचं लग्नImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 3:24 PM

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलाना पांडे हिच्या लग्नाची धूम पहायला मिळतेय. अलाना ही अभिनेते चंकी पांडे यांचा भाऊ चिक्की पांडेंची मुलगी आहे. बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेशी तिने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान, महिमा चौधरी, जॅकी श्रॉफ यांसह बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर अलाना आणि आयव्हरच्या लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र या लग्नातील अलानाचे कपडे पाहून नेटकरी भडकले आहेत.

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये अलाना आणि आयव्हर सप्तपदी घेताना दिसत आहेत. त्यांच्या जवळपास उभे असलेले पाहुणे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. लग्नासाठी अलाना आणि आयव्हर यांनी पांढऱ्या रंगाची निवड केली. इतकंच नव्हे तर लग्नमंडपसुद्धा पांढऱ्या फुलांनीच सजवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

अलाना आणि आयव्हरने लग्नात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले, यावरून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘यांच्या आईवडिलांनाही भारतीय संस्कृती माहीत नाही का? एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जातात. लग्नात गुलाबी, लाल, मरून किंवा त्याच्याशी मिळत्याजुळत्या रंगांचे कपडे परिधान करायला हवेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘जेव्हा पतीचं निधन होईल तेव्हा लाल रंगाची साडी नेस’, असा टोला दुसऱ्या युजरने लगावला. ‘बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींनी लग्नात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. अशाने एके दिवशी आपली संस्कृतीच बुडेल’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला.

पहा व्हिडीओ

कोण आहे अलाना पांडे?

अनन्याची बहीण अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यावर तिने दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा होणारा पती आयव्हर मॅक्रे हा दिग्दर्शक आहे. हे दोघं गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे अभिनेता, निर्माता सोहैल खानच्या घरी हा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. चिक्की पांडे आणि सोहैल खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत, असं म्हटलं जातं. त्यामुळे सोहैलच्या घरी मेहंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.