Ananya Panday | सोशल मीडियावर अनन्या पांडे कोणाला करते स्टॉक? अभिनेत्रीने सांगितलं खास व्यक्तीचं नाव
Ananya Panday | सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला स्टॉक करत असतो; अनन्या पांडे देखील आदित्य रॉय कपूर याला नाही तर, 'या' व्यक्तीला करते स्टॉक
मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री अनन्या पांडे सध्या ‘ड्रिम गर्ल २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘ड्रिम गर्ल २’ सिनेमा शुक्रवारी म्हणजे आज प्रदर्शित झाला आहे. ‘ड्रिम गर्ल २’ सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रिम गर्ल’ सिनेमाचा सिक्वल आहे. सिनेमात अनन्या पांडे हिच्या सोबत अभिनेता आयुषमान खुराना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘ड्रिम गर्ल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. म्हणून ‘ड्रिम गर्ल २’ सिनेमा प्रेक्षकांचं किती मनोरंजन करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनन्या पांडे स्टाररर ‘ड्रिम गर्ल २’ सिनेमा ‘पठाण’ आणि ‘गदर २’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकतो का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या अनन्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत अनन्या पांडे हिने मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला स्टॉक करत असतो. अनन्या पांडे देखील आदित्य रॉय कपूर याला नाही तर, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध व्यक्तीला स्टॉक करत असते. अनन्या पांडे सध्या तिच्या वक्तव्यामुळे तुफान चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावरबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी फार मोठी स्टॉकर आहे. अनेक गोष्टी मी स्टॉक करत असते, ज्याचा उपयोग मला अभिनयात होतो. ‘ड्रिम गर्ल २’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मी मथूरा याठिकाणी होती, तेथे मी लोकांना स्टॉक करायची. त्यांचं बोलणं, त्यांच्या चालीरिती सर्वकाही फॉलो केलं. ज्याचा उपयोग मला सिनेमासाठी झाला…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी सोशल मीडियावर सर्वात जास्त जीनत अमन यांना स्टॉक करते. त्यांचे कॅप्शन पण मला फार आवडतात. त्या कायम स्वतःचे जुन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मी त्यांचे सिनेमे पाहत असते…’ सध्या सर्वत्र अनन्या पांडे हिच्या वक्तव्याची आणि सिनेमाची चर्चा रंगत आहे.
अनन्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघे परदेशात एकत्र फिरण्यासाठी देखील गेले होते. दोघांचे फोटो देखील तुफान व्हायरल झाले होते. पण अनन्या आणि आदित्य यांनी नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही.