Ananya Panday | अनन्या पांडे हिने केले ट्रोलिंगबद्दल मोठे भाष्य, अरे हे काय बोलून गेली चंकी पांडेची लेक, थेट म्हणाली

चंकी पांडे याची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे अनन्या पांडे हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, तो फ्लाॅप गेला.

Ananya Panday | अनन्या पांडे हिने केले ट्रोलिंगबद्दल मोठे भाष्य, अरे हे काय बोलून गेली चंकी पांडेची लेक, थेट म्हणाली
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 3:22 PM

मुंबई : ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मान खुराना याचा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा परत एकदा ड्रीम गर्ल 2 मध्ये पूजाच्या भूमिकेतून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसणार आहे. मात्र, यावेळी ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान खुराना याच्यासोबत चंकी पांडेची लेक अनन्या पांडे (Ananya Panday)  ही दिसणार आहे. विशेष म्हणजे ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे हे दिसत आहेत. चित्रपट धमाका करणार असल्याचे सांगितले जात आहे.

या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे. दुसरीकडे मात्र, नुसरत भरूचा हिचे चाहते ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या विरोधात दिसत आहेत. कारण ड्रीम गर्ल 1 मध्ये नुसरत भरूचा ही मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे नुसरत भरूचा आणि आयुष्मान खुराना यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि या चित्रपटाने मोठा धमाका देखील बाॅक्स आॅफिसवर केला होता.

असे असताना देखील नुसरत भरूचा हिला ड्रीम गर्ल 2 मधून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यामुळे अनेकांनी थेट ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या निर्मात्यांवर नेपोटिझमचा आरोप देखील केला आहे. काही दिवसांपूर्वीच नुसरत भुरूचा हिने ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या वादावर मोठे भाष्य करत थेट म्हटले होते की, मलाही दु:ख वाटते.

नुकताच आता अनन्या पांडे हिने एका मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अनन्या पांडे ही ट्रोलिंगबद्दल बोलताना दिसली आहे. अनन्या पांडे म्हणाली की, माझ्यावर फार काही ट्रोलिंगचा परिणाम होत नाही. एक अभिनेत्री म्हणून. मात्र, लोक ट्रोलिंग करताना कुठेतरी विसरून जातात की, कलाकार देखील माणूस आहेत.

एक माणूस म्हणून मला देखील बऱ्याच वेळा ट्रोलिंगचा त्रास होता. मात्र, मी जास्त करून होणाऱ्या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचेच काम करते. जेव्हा कोणी म्हणते की तू हे करू शकते किंवा ते वेगळ्या पद्धतीने करू शकता, तेव्हा मी ते नेहमीच स्वीकारते. मला शिकणे आणि ते पुढे घेऊन जाणे कधीच थांबवायचे नाहीये.

शक्यतो मी ट्रोलिंगकडे लक्षच देत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे ही तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील जोरदार चर्चेत आहे. अभिनेता आदित्य राॅय कपूर याला अनन्या पांडे ही डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य राॅय कपूर आणि अनन्या पांडे यांचे विदेशातील काही खास फोटो तूफान व्हायरल झाले होते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.