अनन्या पांडे हिने केली चक्क सारा अली खान हिची पोलखोल, थेट स्टेजवर अभिनेत्रीने..
अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अनन्या पांडे हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अनन्या पांडे ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर अनन्या पांडे हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुंबई : अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे आणि सारा अली खान या करण जोहर याच्या शोमध्ये पोहचल्या होत्या. इतकेच नाही तर अनन्या पांडे आणि सारा अली खान या खूप जास्त चांगल्या मैत्रिणी आहेत. अनन्या पांडे ही तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहे. नुकताच अनन्या पांडे ही सारा अली खान हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा करताना दिसली. सारा अली खान हिची मोठी पोलखोल अनन्या पांडे हिने केली आहे.
अनन्या पांडे ही म्हणाली की, आम्ही एका लग्नात गेलो होतो. मुळात ते लग्न नव्हते तर लग्नाची पार्टी होती. सारा अली खान हिने अचानकपणे त्या पार्टीमध्ये धिंगाना करण्यास सुरूवात केली. पार्टीमध्ये जेवण करत असताना अचानक सारा अली खान ही स्टेजवर पोहचली, तिथे गाणे सुरू होते आणि तिथे ती एका काकांसोबत डान्स करत होती.
पुढे अनन्या पांडे ही म्हणाली की, सारा अली खान हिला अक्षरक्षा स्टेजवरून खाली ओढत आणावे लागले. अनन्या पांडे म्हणाली, साराने मुंबईतील त्या लग्नाच्या पार्टीमध्ये धिंगाना करण्याचे ठरवले होते. सारा अली खान हिचे ते रूप पाहून मी हैराण झाल्याचे सांगताना देखील अनन्या पांडे ही दिसली आहे. अनन्या पांडे हिचा खो गए हम कहा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे हिचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वी लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, अनन्या पांडे हिच्या या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. लाईगर चित्रपटामध्ये अनन्या पांडे हिच्यासोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसला.
सारा अली खान हिचे देखील एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सारा अली खान हिचे हे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात तिच्यासोबत विकी काैशल हा मुख्य भूमिकेत दिसला. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले.