…अन् शर्मिला ठाकरे वहिनींनी थेट थिएटरचं बूक केलं, रितेश देशमुख यांनी सांगितलं
चित्रपट हा माझा किंवा तुमचा असा नसतो. ही एक इंडस्ट्री आहे. ठाकरे यांनी इंडस्ट्रीला आपलं मानल आहे.
मुंबई : रितेश देशमुख यांच्या वेड चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर धूम सुरू आहे. यानिमित्त राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी थेट थिएटरचं बूक केला. रितेश देशमुख, जेनेलिया आणि शर्मिला ठाकरे एकत्र आले होते. यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, मला सगळ्यात जास्त आनंद झाला. आम्ही नेहमी भेटत असतो. जेनेलिया देशमुखला दोन मुलं झाली. दहा-बारा वर्षांपूर्वी तीचं लग्न झाल्याचं तिच्या चेहऱ्यावर कुठही दिसत नाही. जेनेलिया या खूप सुंदर अभिनेत्री आहेत. तीनं पुन्हा अभियनाकडं वळावं, असं तिला नेहमी सांगत होते. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, तू मला वेळ मागितला. मी थिएटरचं बूक केलं.
रितेश देशमुख म्हणाले, चित्रपट हा माझा किंवा तुमचा असा नसतो. ही एक इंडस्ट्री आहे. ठाकरे यांनी इंडस्ट्रीला आपलं मानल आहे. ती भावना सर्वांनी पुढं नेली पाहिजे. वेड हा प्रेक्षकांचा चित्रपट आहे. तो मोठा होत असेल तर प्रेक्षकांमुळं होतोय. प्रेक्षक थिएटरमध्ये येतात. त्यांना चांगले चित्रपट देण्याची जबाबदारी आमची असल्याचंही रितेश देशमुख यांनी सांगितलं.
वेड या चित्रपटाला दहा दिवस झाले. दहा दिवसांत सैराटपेक्षा जास्त कमाई या चित्रपटानं केली. एखादा चित्रपट दुसऱ्या चित्रपटासोबत तुलना केली जाऊ शकत नाही. कला आणि वाणिज्य यातून चित्रपट चालत असतो, असंही रितेश यांनी सांगितलं.
प्लाझा थिएटरमध्ये लहानपणापासून येतो. परत वेड हा चित्रपट राज्यभर चालतोय. प्लाझामध्ये आज मोठा शो दाखविला जात आहे. आपले प्रेक्षक आपला चित्रपट पाहिला जातो. त्यामुळं मन भरून येतो. राज ठाकरे हे दौऱ्यात होते. त्यांच्यासोबत लवकरच वेड चित्रपट पाहणार आहे.