बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; एकेकाळी गाजवलेलं क्रिकेटचं मैदान

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वात सर्वत्र शोककळा... बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचं निधन, एकेकाळी गाजवलेलं क्रिकेटचं मैदान... सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली...

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; एकेकाळी गाजवलेलं क्रिकेटचं मैदान
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 5:19 PM

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील एका प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या वडिलांचं निधन झालं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिनेत्याच्या वडिलांनी एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेलं होतं. आता त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये आणि क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेता अंगद बेदी याचे वडील आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचं निधन झालं आहे. बिशन सिंह बेदी यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिशन सिंह बेदी यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रीटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी श्रद्धांजवी वाहिली आहे.

अभिनेता संजय दत्त याने बिशन सिंह बेदी यांच्या निधनानंतर ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘क्रिकेटने आज एक दिग्गज गमावला आहे. पण बिशन सिंह बेदी यांनी तयार केलेल्या आठवणी आणि क्षण कायम जिवंत राहतील… त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करताना विचार त्यांच्या कुटुंबासह आणि संपूर्ण क्रिकेटविश्वासोबत आहेत… ‘ सध्या सर्वत्र अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

बिशन सिंह बेदी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिशन सिंह बेदी हे त्यांच्या काळातले दिग्गज स्पिनरपैकी एक होते. बिशन सिंह बेदी यांनी टीम इंडियाचं नेतृत्वही केलं होतं. बिशन सिंह बेदी यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बिशन सिंह बेदी यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रत्येक जण बिशन सिंह बेदी यांच्याबाबतच्या क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देत आहे. त्यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. असं म्हणायला हरकत नाही.

बिशन सिंह बेदी यांनी आपल्या स्पिनच्या जोरावर टीम इंडियासाठी 67 टेस्ट मॅचमध्ये 266 विकेट्स आपल्या नावावर केल्या. मात्र बेदींची वनडे कारकीर्द हे कसोटीच्या तुलनेत फारशी मोठी ठरली नाही. बेदी यांनी 10 वनडे मॅचेसमध्ये 7 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यांसारखे अनेक रेकॉर्ड  बिशन सिंह बेदी यांनी आपल्या नावावर केले होते.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.