Pakistan Flood: “अशी दृश्यं कधीच पाहिली नाही”; पाकिस्तानची पूरपरिस्थिती पाहून अभिनेत्री हळहळली
अँजेलिना धावली पाकिस्तान पूरग्रस्तांच्या मदतीला; म्हणाली, "अशी दुर्दशा.."
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) सध्या पाकिस्तानमध्ये आहे. तिथल्या पूरग्रस्तांची ती भेट घेत आहे, त्यांना मदत करत आहे. पाकिस्तानच्या पूराची (Pakistan Flood) दृश्यं मन हेलावून टाकणारी आहेत. याप्रकरणी अँजेलिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती पाकिस्तानमधल्या पूरपरिस्थितीबद्दल बोलताना दिसत आहे. आता आपल्याला जागं होण्याची गरज आहे, असं तिने म्हटलंय. पाकिस्तानमधील लोकांची अवस्था पाहून अँजेलिना खूपच निराश झाली आहे. “मी असा प्रकार कधीच पाहिला नाही. जर पुरेशी मदत मिळाली नाही, तर ते त्यातून सावरू शकणार नाही. हिवाळा येतोय आणि इथं असंख्य मुलं कुपोषित आहेत.”
अँजेलिनाचा जगाला संदेश
“मला वाटतं हा संपूर्ण जगासाठी एक इशारा आहे. आपण आता कुठे आहोत, हे यातून दिसतंय. हवामान बदल हे केवळ वास्तविक नाही, तो बदल आपल्याकडे येत नाहीये तर तो इथेच आहे,” अशा शब्दांत तिने चिंता व्यक्त केली.
Angelina Jolie visiting IRC’s response to the devastating floods in Pakistan — and for helping bring attention to the effects of the climate crisis. #Pakistanfloods2022 #pakistanflood pic.twitter.com/0paSoaVNLp
— 4AJ✨ (@4youAJ_) September 20, 2022
संकटकाळात पाकिस्तानी नागरिकांची मदत करण्याची अँजेलिनाची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2005 मध्ये जेव्हा पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप आला होता, तेव्हासुद्धा ती तिथे गेली होती. 2010 मध्येही जेव्हा पुरामुळे तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती, तेव्हासुद्धा ती पाकिस्तानच्या मदतीला धावली होती.
“I’ve never seen anything like this,” Angelina Jolie says on #Pakistan flood devastation. “If enough aid doesn’t come, they wont make it, too many children, so malnourished… winter is coming..I’m overwhelmed but i don’t feel its fair to say that because i am not living in this” pic.twitter.com/uY2k1123jS
— Mehreen Zahra-Malik (@mehreenzahra) September 21, 2022
पाऊस आणि पुरामुळे पाकिस्तानमधील परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. या नैसर्गिक आपत्तीने हजारोंचा जीव घेतला. तर लाखो लोक बेघर झाले. सर्वत्र पाणीच पाणी आहे आणि त्यामुळे रोगराई पसरत आहे. डेंग्यू, मलेरियामुळेही लोकांचा मृत्यू होतोय. पाकिस्तानला मदतीची गरज असून इतर देशांनी पुढे यायला हवं, असं आवाहन अँजेलिनाने केलंय.