आता ते भोगतायत..; घटस्फोटाबद्दल स्पष्टच बोलला अनिकेत विश्वासराव, पत्नीने केले होते अत्याचाराचे आरोप

अभिनेता अनिकेत विश्वासराव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. माझ्यासोबत चुकीचं वागणारे आता भोगतायत, असं तो म्हणाला. त्याचप्रमाणे शहाण्या माणसाने सत्यासाठी कोर्टाची पायरी चढावी, असंही तो म्हणाला.

आता ते भोगतायत..; घटस्फोटाबद्दल स्पष्टच बोलला अनिकेत विश्वासराव, पत्नीने केले होते अत्याचाराचे आरोप
अनिकेत विश्वासरावImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 1:05 PM

अभिनेता अनिकेत विश्वासरावने मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयकौशल्याची विशेष छाप सोडली आहे. अनिकेत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. काही वर्षांपूर्वी त्याने स्नेहा चव्हाणशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच ते विभक्त झाले. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिकेत याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अनिकेत म्हणाला, “तुमची लढाई सत्यासाठी असेल तर तुम्ही नक्कीच माणून म्हणून पुढे जाता. आयुष्यातील कठीण काळात तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्ही आणखी खंबीर होता. ‘ऊन-पाऊस’ या मालिकेपासून मी माझ्याबद्दलच्या नकारात्मक चर्चा ऐकतोय. अनिकेत संपला, हा वन टाइम वंड आहे, एक प्रोजेक्ट करेल मग गायब होईल.. असं लोक म्हणायचे. पण कोण काय बोलतंय याने मला फरक पडत नाही. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे आपण किती खंबीर आहोत आणि आपली किंमत काय आहे हे समजतं. मी असे अनेक फटके खाल्ले आहेत. त्यामुळे माझ्यातील कणखरपणा वाढला आहे, पण माझ्यातला चांगुलपणा अजिबात कमी झालेला नाही.”

हे सुद्धा वाचा

“ज्या लोकांना माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी केल्या आहेत, ते आता भोगत आहेत. मला त्या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रास झाला, पण जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. मला वकिलाच्या रुपात एक चांगला मित्र भेटला. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असं नेहमी म्हटलं जातं. पण मी म्हणतो कोर्टात जायचं. बिनधास्त जायचं. तुम्हाला न्याय मिळेल. आपली न्यायव्यवस्था खूप चांगली आहे”, असं त्याने पुढे सांगितलं.

2021 मध्ये स्नेहा चव्हाणने अनिकेत विश्वासरावसह त्याची आई आणि वडिलांविरोधात पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या तिघांवर तिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा आरोप केला होता. ‘अनिकेत विश्वासराव याने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षांच्या काळात सिनेमासृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठ होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. इतकंच नव्हे तर गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला,’ असं स्नेहाने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.