शिल्पा शेट्टीच्या ओठांबाबत अनिल कपूरचा असा खुलासा, ऐकून चाहते झाले हैराण

शिल्पा शेट्टीच्या ओठांवर अनिल कपूर यांचं मोठं वक्तव्य, अनेक वर्षांनंतर शिल्पा शेट्टी हिच्या ओठांबद्दल मोठी गोष्ट समोर... असं काय म्हणाले अनिल कपूर ज्यामुळे चर्चांना उधाण...

शिल्पा शेट्टीच्या ओठांबाबत अनिल कपूरचा असा खुलासा, ऐकून चाहते झाले हैराण
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 2:07 PM

मुंबई : अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) बॉलिवूडच्या अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत, जे कायम त्यांच्या हटके अंदाजामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असतात. अनिल कपूर आज ६६ वर्षांचा असले तरी ते कायम त्यांच्या गुड लुक्समुळे प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. आज बॉलिवूडमध्ये अनेक नवीन अभिनेते आहेत, पण अनिल कपूर यांची जागा आजपर्यंत कोणी घेवू शकलं नाही. अनिल कपूर त्यांच्या गुड लूक्स आणि अभिनयामुळे तर कायम चर्चेत असतात, पण अभिनेते त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे देखील कायम चर्चेत असतात. काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अनिल यांनी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचं मोठं गुपित उघड केलं होतं.

शोमध्ये करण जोहर याच्यासोबत गप्पा मारत असताना, अनिल कपूर यांनी शिल्पा शेट्टी हिच्या ओठांच्या सर्जरीबद्दल मोठा खुलासा केला होता. तेव्हा अनिल कपूर यांनी शिल्पा हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. शोमध्ये रॅपिड फायर राउंडमध्ये करण जोहर याने अनिल कपूर यांना एका प्रश्न विचारला होता. ज्यामध्ये करणने अभिनेत्याला बोटोक्सबद्दल प्रश्न विचारला.

हे सुद्धा वाचा

करणने विचारलं, ‘तुम्ही कोणाचा चेहरा पाहिला आहे, जो बोटोक्समुळे खराब झाला…’ या प्रश्नाचं उत्तर देत असताना अनिल कपूर यांनी विचार केला आणि म्हणाले, ‘कोण आहे? ते ओठांवर काय करतात?’ यावर करण म्हणतो, ‘कोलेजन…’ त्यानंतर पुढे अनिल कपूर म्हणतात, ‘मी कोलेजनवर बोलू शकेल? शिल्पाने ‘बधाई हो बधाई’ सिनेमा दरम्यान ओठांवर जे काही केलं होतं ते मला बिलकूल आवडलं नाही…’

shilpa shetty

पुढे अनिल कपूर म्हणाले, ‘शिल्पाचे ओठ प्रचंड जाड झाले होते. तिच्या ओठांचा आकार पूर्णपणे बदलला होता. सिनेमासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. एका सीनमध्ये शिल्पाने ओठ बारीक आहेत आणि दुसऱ्या सीनमध्ये अचानक मोठे झाल्याचं पाहून चाहत्यांना देखील अजब वाटेल…’

पण शोमध्ये अनिल कपूर पुढे म्हणाले, ‘शिल्पाचे ओठ चांगले दिसत होते’ सांगायचं झालं तर, शिल्पा आणि अनिल कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. दोघे ही सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसले तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असतात.

shilpa shetty

शिल्पा शेट्टी आणि अनिल कपूर दोघे ही अत्यंत फिटनेस फ्रिक आहेत. सोशल मीडियावर कायम वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दोघे चाहत्यांनी फिट राहण्याचं आवाहन करत असतात.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.