20-25 गर्लफ्रेंडस्, लग्नानंतरही अफेअर्स; माधुरी, शिल्पासोबत जोडलं होतं नाव; 134 कोटींची संपत्ती असलेला हा अभिनेता कोण?

लग्नाआधी 20-25 मुलींसोबत अफेअर्स,लग्नानंतरही अफेअर्स, माधुरी दिक्षितसोबत अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं. पण हा अभिनेता त्याच्या हटक्या स्टाइलने बॉलिवूडवर राज्य करतोय. कोण आहे हा अभिनेता पाहुयात.

20-25 गर्लफ्रेंडस्, लग्नानंतरही अफेअर्स; माधुरी, शिल्पासोबत जोडलं होतं नाव; 134 कोटींची संपत्ती असलेला हा अभिनेता कोण?
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 7:50 PM

बॉलिवूडमध्ये अफेअर्स म्हटलं की त्याच्या चर्चा तर होणारच. काही अभिनेत्यांच्या तर अफेअर्सच्या इतक्या चर्चा आणि किस्से आहेत की आजही त्याबद्दल बोललं गेलं की सर्वांना आश्चर्य वाटतं. असाच एक प्रचंड प्रसिद्ध असलेला अभिनेता ज्याच्या अभिनयाबद्दल,चित्रपटांबद्दल सर्वांकडूनच नेहमीच कौतुक झालं आहे. पण या अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित असेल .

20-25 मुली गर्लफ्रेंडस् होत्या

अभिनेत्याबद्दल सर्वात चर्चा झाली असेल तर ती त्याच्या अफेअर्सबद्दल. हा अभिनेता म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूडचा लखन अनिल कपूर. हो, हे जाणून अनेकांना धक्का बसेल की अनिल कपूर यांच्या लग्नाआधी जवळपास लग्नाआधी फिल्म इंडस्ट्रीतील 20-25 मुली त्यांच्या गर्लफ्रेंड बनल्या होत्या. अनेक मुलींना त्यांनी डेट केलं होतं. काही वर्षांनी त्यांचे सुनिता यांच्याशी लग्न झाले पण लग्नानंतर देखील अफेअर्सच्या चर्चा काही थांबल्या नाहीत.

लग्नानंतरही अनिल कपूर यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. अनिल कपूरचे नाव किमी काटकरसोबत जोडले गेले होते .त्या काळात अनिल अनेकदा आपल्या चित्रपटांसाठी मुख्य अभिनेत्रींची नावे सुचवत असे. जेव्हा सुनीता यांना या गोष्टी कळल्या, तेव्हा ती काही बोलली नाही आणि जेव्हाही तिला कोणी काही विचारले तेव्हा ती फक्त एवढंच सांगायची की मला माझ्या पतीवर पूर्ण विश्वास आहे की तो हे करणार नाही.

माधुरी दीक्षितसह अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत जोडलं नाव 

मात्र नंतर अनिल कपूरच्या किमीसोबतच्या अफेअरचा अध्याय बंद करण्यासाठी ती अचाकन चित्रपटाच्या सेटवर पोहोचली. सुनीताला सेटवर पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. मीडिया रिपोर्टनुसार किमीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनिलचे नाव 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री शिल्पा शिरोडकरसोबतही जोडले गेले. मात्र, लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले, त्यानंतर अनिलचे नाव माधुरी दीक्षितसोबतही जोडले गेले.

View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

एकीकडे अनिल कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देत असताना दुसरीकडे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी घट्ट जोडले गेले होते. मात्र, काही काळानंतर दोघांनीही काम करणे बंद केले. यामागे सुनीता कारणीभूत आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा अनिल कपूरचे नाव माधुरीसोबत जोडले जाऊ लागले तेव्हा सुनीता अचानक एका चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आणि नंतर याही बातम्यांना पूर्णविराम मिळाला.

67 व्या वर्षी तरुणालाही लाजवेल अशी त्यांची एनर्जी  आणि लूक

अनिल कपूर यांची वयाच्या 67 व्या वर्षी तरुणालाही लाजवेल अशी त्यांची एनर्जी  आणि लूक आहे. कधी गॅरेजमध्ये रात्र काढली तर कधी चाळीत दिवस घालवले. अभिनेताशिवाय घरातील अनेक जण बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. अनिल कपूर देखणेपणासाठी आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या हटक्या स्टाइल बॉलिवूडवर राज्य केलं.आज म्हणजे 24 डिसेंबरला त्याचा 68 वा वाढदिवस आहे.

लक्झरी लाईफ जगतायत अनिल कपूर

दरम्यान अनिल कपूर यांनी आपल्या 4 दशकांहून अधिक काळातील चित्रपट कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. रिपोर्टनुसार अनिल कपूर यांची संपत्ती 134 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे म्हटले जाते. आज अनिल कपूर एका चित्रपटात काम करण्यासाठी 2 कोटी रुपये घेतात. त्याचवेळी अनिल कपूर एका जाहिरातीसाठी 55 लाख रुपये घेतात. त्याचबरोबर अनिल यांचा जुहूमध्ये 30 कोटींचा बंगलाही आहे.

यासोबतच अनिल कपूरचे दुबईतील अल-फुरझानमध्येही एक अपार्टमेंट आहे. अनिल कपूरच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे 1.45 कोटी रुपयांची BMW लक्झरी कार आहे. त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी गॅलार्डो स्पायडर, ऑडी, मर्सिडीज बेंझ एस क्लास देखील आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.