एका बड्या अभिनेत्याच्या गॅरेजमध्ये अनिल कपूर राहायचा, अखेर दिवस त्या महिलेमुळे बदलले
अनिल कपूर या अभिनेत्याला त्या बड्या अभिनेत्याने गॅरेजमध्ये राहायला जागा दिली होती, पुढे त्या महिलेमुळे अनिल कपूरचे असे दिवस बदलले... कोण आहे ती महिला?
Anil Kapoor Life : प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात. काही जण येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढतात, तर काही मात्र पूर्णपणे खचून जातात. अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या आयुष्यात देखील अडचणी आल्या. पण अभिनेत्याने कधीही माघार घेतली नाही. अनिल कूमार यांनी कायम अपयशावर मात करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. आज कपूर कुटुंबाची ओखळ देशातच नाही तर, संपूर्ण जगात वेगळी असली तरी करियरच्या सुरुवातीला कपूर कुटुंबाने मोठा खस्ता खाल्ला आहे. जेव्हा कपूर कुटुंब मुंबईत आलं होतं, तेव्हा ते राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहयचे. त्यानंतर त्यांनी एका सामान्य भागात भाड्याने घर घेवून राहण्याचा निर्णय घेतला. (Anil Kapoor Life story)
सुरुवातीला अनिक कपूर आणि कुटुंबाने हालाकीचे दिवस पाहिले. अनिल कपूर यांचे वडील दिग्दर्शक होते. त्यामुळे लहानपणापासूनच अनिल कपूर यांनी अभिनयाची आवड होती. अनिल कपूर यांनी त्यांच्या करियरची सुरुवात १९८० साली प्रदर्शित झालेल्या तेलूगू सिनेमातून केली. सिनेमाचं नाव होतं ‘वामसा व्रुक्षम’… (Anil Kapoor love story)
कलाविश्वात स्वतःचे ओळख निर्माण करत असताना अनिल कपूर यांच्या आयुष्यात प्रसिद्ध मॉडेल सुनीता यांची एन्ट्री झाली आणि त्यांचे दिवस पूर्णपणे बदलले. आनिल यांनी सुनिता यांच्या जवळ यायचं होतं, पण त्यांना मार्ग सापडत नव्हता. अखेर मित्रांनी अनिल कपूर यांना सुनिता यांचा फोन नंबर दिला. त्यानंतर दोघांमध्ये गप्पांना सुरुवात झाली. अनिल कपूर यांना सुनिता यांचा आवाज प्रचंड आवडायचा. अखेर अभिनेत्याने सुनिता यांच्यासमोर डेटवर जाण्याचा प्रस्ताव ठेवला.
View this post on Instagram
अनिल कपूर यांचा प्रस्ताव सुनिता यांनी देखील आनंदाने मान्य केला. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र टॅक्सीमधून फिरायला गेले. तेव्हा अनिल कपूर स्ट्रगल करत होते. त्यामुळे आनिल यांचा संपूर्ण खर्च सुनिता करायच्या. अखेर आनिल यांनी सुनिता यांना लग्नाची मागणी घातली आणि गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. दोघांच्या कुटुंबियांना आनिल आणि सुनिता यांच्या नात्याची कोणतीही अडचण नव्हती. (sunita anil kapoor)
पण मित्रांनी मात्र लग्न करू नको असा सल्ला अनिल यांना दिला. लग्न झाल्यानंतर करियरवर त्याचा परिणाम होईल असं अनिल यांना मित्रांनी सांगितलं. त्यामुळे दोन वेळा अनिल आणि सुनिता यांचं लग्न रद्द झालं. अनेक वर्ष डेट केल्यानंतर १९ मे १९८४ साली दोघांनी लग्न केलं आणि १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमामुळे अनिल कपूर यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनिल कपूर यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.