दुबईतील श्रीमंत महिलेमुळे Anil Kapoor यांचा मुलगा जगतोय रॉयल आयुष्य; अभिनेत्याच्या मुलाचा मोठा खुलासा
'दुबईतील श्रीमंत महिलेला डेट करत आहे, तिचं माझे...', अनिल कपूर यांच्या मुलाचा खासगी आयु्ष्याबद्दल मोठा खुलासा... सध्या सर्वत्र हर्षवर्धन कपूर याच्या गर्लफ्रेंडची चर्चा...
मुंबई | 23 जुलै 2023 : स्टारकिड्स कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेक सेलिब्रिटींच्या मुलांना बॉलिवूडमध्ये सहज प्रवेश करता आलं. काही सेलिब्रिटी किड्स आता बॉलिवूडवर राज्य करत आहेत. पण काही स्टारकिड्सच्या नशिबात मात्र अपयश आलं. अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. पण अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याला बॉलिवूडमध्ये वडिलांप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. हर्षवर्धन सोशल मीडियापासून देखील दूर असतो. पण आता हर्षवर्धन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र अनिल कपूर यांच्या मुलाच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे.
नुकताच हर्षवर्धन याने लग्जरी शूज अनबॉक्स करताना व्हिडीओ पोस्ट केला होता. जो त्याला अनेक दिवसांनंतर मिळाला. व्हिडीओमध्ये हर्षवर्धन म्हणाला, मला लग्जरी शूज प्रचंड आवडतात आणि माझ्याकडे लग्जरी शूजचं मोठं कलेक्शन देखील आहे. लग्जरी शूजबद्दल हर्षवर्धन याचं असलेलं क्रेझ चाहत्यांना प्रचंड आवडलं. पण काहींनी मात्र त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
एक युजर व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘लग्जरी शूजचं बिल कोण भरतं. वडील अनिल कपूर की, जीजा आनंद आहुजा?’ हर्षवर्धन याने ट्रोलरला देखील सडेतोड उत्तर दिलं. ‘दोघांपैकी कोणी नाही. मी दुबईतील एका श्रीमंत महिलेसोबत सिक्रेट रिलेशनशिपमध्ये आहे. तिचं लग्न झालं आहे. पण ती माझ्या प्रेमात वेडी आहे..’
‘तिच माझ्या सर्व महागड्या वस्तूंचं बिल भरते. हे सिक्रेट आता तुम्हाला माहिती झालं आहे. कारण माझ्यासाठी तुम्ही फार महत्त्वाचे आहात. आता रात्री तुम्हाला शांत झोप लागले अशी आशा करतो. तुमच्याकडे आता मोठी माहिती आहे…’ असं देखील हर्षवर्धन म्हणाला.
हर्षवर्धन कपूर याच्या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर देखील कपूर कुटुंबातील मुलाच्या खासगी आयुष्याची तुफान चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर हर्षवर्धन स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. पण शूज अनबॉक्स करताना व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे स्टारकिड चर्चेत आला आहे.
हर्षवर्धन कपूर याच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याला वडिलांप्रमाणे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थार’ सिनेमात हर्षवर्धन झळकला. सिनेमात त्याने वडील अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. पण हर्षवर्धन चाहत्यांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरला.