अनिल कपूर पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून दिसणार, नायक सिनेमाचा सिक्वेल येणार

23 वर्षापूर्वी रिलीज झालेला नायक सिनेमा आजही अनेकांना आठवतो. आज ही सिनेमा तितक्याच आवडीने लोकं पाहतात. पण या सिनेमाचा आता सिक्वेल येणार आहे. नायक सिनेमाच्या कथेवर काम सुरु आहे. नायक २ हा सिनेमात अनिल कपूर आणि राणी मुखर्जी पुन्हा एकत्र दिसू शकतात.

अनिल कपूर पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून दिसणार, नायक सिनेमाचा सिक्वेल येणार
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 7:38 PM

2001 मध्ये ‘नायक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा आजही तितकाच चर्चेत राहतो. या सिनेमाची कथा आजही अनेकांना आठवते.. या चित्रपटात राणी मुखर्जी, अनिल कपूर, पूजा बत्रा, अमरीश पुरी आणि जॉनी लीव्हर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. अनिल कपूर यांनी मुख्यमंत्र्याची भूमिका सारकारली होती. एक मुख्यमंत्री कसा असावा यावर हा सिनेमा होता. या सिनेमातील त्यांची ही भूमिका अनेकांना आवडली होती. आज २३ वर्षांनंतर देखील नायकच्या कथेची चर्चा होते. पण आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचं कळतं आहे. निर्माते या चित्रपटात कोणाला कास्ट करणार याचीही प्लॅनिंग सुरू झाली आहे.

नायक सिनेमाचा सिक्वेल

एका न्यूज पोर्टलशी बोलताना सिनेमाचे निर्माता मुकुट यांनी ‘नायक-2’ चित्रपटाची माहिती दिलीये. ‘नायक-२’ प्रोजेक्टवर काम करत असून लवकरच त्याची घोषणा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. चित्रपटात अभिनेते अनिल कपूर आणि राणी मुखर्जी यांना त्यांच्या भूमिकेत परत आणण्याची त्यांची योजना असल्याचं मुकुट यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, “आम्ही सिक्वेलची योजना आखत आहोत. पात्र तिच असतील. पहिल्या सिनेमाच्या कथेवरच पुढची कथा तयारी केली जाणार आहे. मी निर्माता ए.एम. रत्नम यांच्याकडून त्याचे हक्क खूप पूर्वी विकत घेतले होते. आम्ही सध्या स्क्रिप्टवर काम करत आहोत आणि इतर कलाकारही या चित्रपटात असतील. कथा लिहिल्याबरोबरच बाकीच्या गोष्टीही दिसू लागतील, पण अजून काही ठरलेले नाही.

नायक 2 ची कथा काय असेल

निर्माते मुकुट यांनी असेही सांगितले की सध्या तो सिक्वेलच्या संदर्भात सुरुवातीच्या टप्प्यात आहे, परंतु त्यांनी राणी मुखर्जी आणि अनिल कपूर यांच्याशी बोलणे सुरू केले आहे. नायकच्या सिक्वेलची कथा जिथून संपली तिथून सुरू होईल अशी माहिती आहे.

अमरीश पुरी यांचा खरा चेहरा पुढे आणल्यानंतर अनिल कपूर मुख्यमंत्रीपदी विराजमान होतात. यापुढेच ही कथा नेली जाऊ शकते. राणी मुखर्जी आणि अनिल कपूर यांनी या चित्रपटासाठी सहमती दर्शवली तर त्यांची जोडी 23 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.