Priyanka Chopra | इतना खराब चेहरा; प्रियांका चोप्राच्या नाकाच्या सर्जरीबद्दल ‘गदर 2’चे दिग्दर्शक असं का म्हणाले?

एका सर्जरीदरम्यान प्रियांकाचा चेहराच बिघडला होता. बॉलिवूडमधील करिअर सुरू होण्याआधीच संपलंय, अशी भीती तिला वाटू लागली होती. या घटनेमुळे तिने नैराश्याचाही सामना केला. त्यातून सावरण्यासाठी प्रियांकाला बराच काळ लागला.

Priyanka Chopra | इतना खराब चेहरा; प्रियांका चोप्राच्या नाकाच्या सर्जरीबद्दल 'गदर 2'चे दिग्दर्शक असं का म्हणाले?
Priyanka ChopraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 10:05 AM

मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : 2000 च्या दशकातील अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही एकमेव अशी अभिनेत्री असावी, जी बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडण्यात यशस्वी झाली. ‘मिस वर्ल्ड 2000’चा किताब जिंकणाऱ्या प्रियांकाने अनिल शर्मा दिग्दर्शित ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. अनिल शर्मा हे ‘गदर’ आणि ‘गदर 2’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात. मात्र त्यापूर्वी प्रियांकाच्या आयुष्यात एक असा काळ होता, जेव्हा ती अभिनयविश्वस सोडण्याचा विचार करत होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिल शर्मा यांनी त्याचा खुलासा केला. त्यावेळी प्रियांका काही महिने नैराश्यात होती. यामागचं कारण म्हणजे तिच्या नाकाची बिघडलेली सर्जरी.

प्रियांकाची नाकाची सर्जरी

प्रियांका चोप्राने तिच्या नाकाची सर्जरी केली, ही बाबा सर्वांनाच ठाऊक असेल. मात्र सुरुवातीला ही सर्जरी योग्य न झाल्याने तिचा चेहराच बिघडला होता. यामुळे तिला इतर काही प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आलं होतं. अनिल यांनी सांगितलं की ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी प्रियांकाला त्यांच्या पुढील चित्रपटासाठी साइन केलं होतं. त्याच्या आधी ते दोन महिन्यांसाठी व्हेकेशनला गेले होते. परंतु जेव्हा ते मुंबईत परतले, तेव्हा त्यांना प्रियांकाच्या नाकाच्या सर्जरीबद्दल समजलं.

सर्जरीनंतर पूर्णपणे खचली प्रियांका

याविषयी ते म्हणाले, “गदर प्रदर्शित झाल्यानंतर मी अमेरिका आणि युरोप फिरायला गेलो. दोन महिन्यांनी परत आल्यानंतर मला समजलं की प्रियांकाने तिच्या नाकाची सर्जरी केली. कारण तिला ज्युलिया रॉबर्टसारखं दिसायचं होतं. त्यावेळी वर्तमानपत्रांमध्ये मी असेच हेडलाइन वाचले होते. ती आधीच खूप सुंदर दिसत होती, मग तिने असा निर्णय का घेतला असा प्रश्न मला पडला होता. मात्र सर्जरीनंतर ती खूपच वाईट दिसू लागली होती. तिचा चेहरा काळवंडलेला वाटत होता. प्रियांकाला नेमकं काय झालं, हे मला कळेनासं झालं होतं. अखेर मी तिला फोन केला.”

हे सुद्धा वाचा

अनिल शर्मा यांनी केली प्रियांकाची मदत

“दुसऱ्या दिवशी प्रियांका तिच्या आईसोबत मला भेटायला आली. त्यांनी मला ऑपरेशनविषयी सांगितलं आणि त्यावेळी दोघींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या सर्जरीमुळे प्रियांकाच्या नाकाखाली एक डागसुद्धा राहिला होता. तो डाग आजही आहे. बरं होण्यासाठी प्रियांकाला काही महिने लागतील आणि आधीच काही प्रोजेक्ट्समधून तिला काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. प्रियांकाला सायनसचा त्रास होता, म्हणून तिने सर्जरी केली असं मला तिच्या आईने सांगतिलं. त्यावेळी ती इतकी नैराश्यात होती की तिने करिअर सोडण्याचा विचार केला होता”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

अनिल शर्मा यांनी त्यावेळी प्रियांकाची मदत केली. त्यांनी इंडस्ट्रीतील दिग्गज मेकअप आर्टिस्टला बोलावलं आणि त्याच्या तीन दिवसांनंतर प्रियांकाची स्क्रीन टेस्ट करण्यात आली. छोट्या केसांमध्ये तिला नवीन लूक दिल्यानंतर आम्ही तो व्हिडीओ सनी देओलसह इतर कलाकारांनाही दाखवला. त्यावेळी सर्वांना ती खूपच सुंदर वाटली. अशा पद्धतीने अनिल शर्मा यांनी प्रियांकाची मदत केली.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.