Gadar | गोविंदा याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, अनिल शर्मा थेट म्हणाले, कधीच गदरसाठी…
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसला. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड ब्रेक केले. चाहत्यांमध्ये गदर 2 चित्रपटाबद्दल एक मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. गदर 2 चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच ठरलाय.
मुंबई : सनी देओल याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल हा विदेशात धमाल करताना दिसतोय. वडील धर्मेंद्र यांच्यासोबत खास वेळ घालवताना सनी देओल (Sunny Deol) दिसतोय. लेकाचे काैतुक करत आणि गदर 2 चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे धन्यवाद मानताना धर्मेंद्र हे दिसले. गदर चित्रपट तब्बल 22 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळाली.
गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल याच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर आल्याचे सांगितले जातंय. गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल याने मुंबईमध्ये एका खास पार्टीचे आयोजन केले. इतकेच नाही तर मागचा वाद सोडून सनी देओल याच्या पार्टीमध्ये शाहरूख खान हा देखील सहभागी झाला. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.
आता नुकताच गदर 2 चित्रपटाचे डायरेक्ट अनिल शर्मा यांनी मोठा खुलासा केलाय. अशी चर्चा होती की, सनी देओल याच्या अगोदर गोविंदा हा गदर चित्रपटासाठी पहिली निवड होता. मात्र, याच चर्चांवर आता अनिल शर्मा यांनी भाष्य केले. अनिल शर्मा यांनी हे स्पष्ट केले की, गोविंदा याच्या नावाच कधीच गदर चित्रपटासाठी विचार केला गेला नाही.
पुढे अनिल शर्मा म्हणाले की, गोविंदा या भूमिकेत कसा असेल? मी गोविंदा याला सांगितले होते की, माझ्याकडे सनी याच्यासाठी एक स्टोरी आहे. विशेष म्हणजे मी त्याला ती स्टोरी वाचूनही दाखवली होती. इतकेच नाही तर गोविंदा याला ही स्टोरी वाचून दाखवण्याच्या अगोदरच मी सनी देओल याला या चित्रपटासाठी फायनलही केले होते.
अनिल शर्मा यांनी हा मोठा खुलासा केलाय. गदर 2 हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालाय. गदर 2 चित्रपटाने 600 कोटींपेक्षाही अधिक कलेक्शन केले. म्हणजेच काय तर सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट सुपर हिट नक्कीच ठरलाय. गदर 2 चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी सनी देओल याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट देखील शेअर केली होती. सनी देओल याचे या चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून काैतुक करण्यात आले. चाहत्यांना सनी देओल याची भूमिका प्रचंड आवडली.