जीव देणार इतक्यात… प्रसिद्ध अभिनेत्याने जीवाची पर्वा न करता तरुणीला वाचवलं; व्हिडीओ तुफान व्हायरल?

| Updated on: Jan 06, 2024 | 3:59 PM

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हे हैराण झाले. एका अभिनेत्याने एका तरूणीना जीवनदान दिले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक त्या अभिनेत्याचे काैतुक करताना दिसत आहेत. रिअल हिरो देखील अभिनेत्याला म्हणण्यात आले.

जीव देणार इतक्यात... प्रसिद्ध अभिनेत्याने जीवाची पर्वा न करता तरुणीला वाचवलं; व्हिडीओ तुफान व्हायरल?
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा ॲनिमल हा चित्रपट धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे रणबीर कपूर याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ॲनिमल या चित्रपटाने मोठा धमाका केला. ॲनिमल चित्रपटामध्ये रणबीर कपूर याच्यासोबत रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत दिसली. विशेष म्हणजे या दोघांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडली. अजूनही ॲनिमल या चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. ॲनिमल हा चित्रपट चर्चेतच दिसतोय. आता ॲनिमल चित्रपटामधील एका अभिनेत्याचे काैतुक केले जात आहे.

फक्त चित्रपटातच नाही तर आता चित्रपटाच्या बाहेर खऱ्या आयुष्यामध्ये देखील रणबीर कपूर याच्या भावाची जोरदार चर्चा रंगत आहे. लोक त्याचे काैतुक करताना दिसत आहेत. रणबीर कपूर याच्या भावाची भूमिका ॲनिमल चित्रपटात साकारणारा अभिनेता मनजोत सिंह याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

मनजोत सिंह याचा हा व्हिडीओ पाहून लोक त्याचे काैतुक करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी मनजोत सिंह याला रिअल लाईफ हिरो देखील म्हटले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून लोक सतत मनजोत सिंह याचे काैतुक करत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक मुलगी ही आत्महत्या करत आहे. याठिकाणी खूप लोक जमल्याचे देखील बघायला मिळत आहे. मात्र, इतकी मोठी गर्दी असूनही कोणीही आत्महत्या करण्यापासून या मुलीला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. तेवढ्यामध्येच अभिनेता मनजोत सिंह हा कोणताही विचार न करता त्या मुलीला वाचवण्यासाठी धावतो.

मनजोत सिंह हा त्या मुलीला पकडतो आणि त्यानंतर काही उपस्थित लोक हे मनजोत सिंह याच्या मदतीला धावून येतात. मनजोत सिंह याने एका मुलीला आत्महत्या करण्यापासून वाचवल्याचे त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय. यामुळेच अभिनेता मनजोत सिंह याला लोक रिअल लाईफ हिरो असल्याचे म्हणताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मनजोत सिंह याने मुलीला आत्महत्या करताना वाचवल्याचा हा व्हिडीओ 2019 मधील आहे. मात्र, सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून तो चर्चेंचा विषय ठरला आहे. मनजोत सिंह याने ॲनिमल चित्रपटामध्ये धमाकेदार भूमिका केली. विशेष म्हणजे चाहत्यांनी त्याच्या भूमिकेला चांगलेच प्रेम दिले.