Animal मध्ये ‘मॅरिटल रेप सीन..’, बॉबी देओल याच्या तिसऱ्या ऑनस्क्रिन पत्नीचं मोठं वक्तव्य

Animal : 'कोणालाही अपेक्षा नसेल, पण...', ‘ॲनिमल’मधील मॅरिटल रेप सीनवर बॉबी देओल याच्या तिसऱ्या ऑनस्क्रिन पत्नीनं सोडलं मौन... सिनेमात अनेक वादग्रस्त सीन आणि डायलॉग आहेत, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.. सोशल मीडियावर देखील सिनेमातील अनेक सीन व्हायरल होत आहेत.

Animal मध्ये 'मॅरिटल रेप सीन..', बॉबी देओल याच्या तिसऱ्या ऑनस्क्रिन पत्नीचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 9:00 AM

मुंबई | 10 डिसेंबर 2023 : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ (Animal) सध्या तुफान चर्चेत आहे. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी मु्ख्य भूमिका साकारली आहे. सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ हा मल्टीस्टारर सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. पण सोशल मीडियावर ‘ॲनिमल’ सिनेमामुळे अनेक वाद निर्माण होताना दिसत आहेत. सिनेमात असे अनेक सीन आहेत, ज्यामुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉबी देओल याच्यावर एक सीन चित्रीत करण्यात आहे. ज्यामध्ये अभिनेता तिसऱ्या ऑनस्क्रिन पत्नीसोबत लग्नादरम्यान आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहे. यावर अखेर अभिनेत्याच्या तिसऱ्या ऑनस्क्रिन पत्नीने मौन सोडलं आहे.

सिनेमात बॉबी देओल याच्या तिसऱ्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका अभिनेत्री मानसी तक्षक हिने साकारली आहे. सिनेमात बॉबी आणि मानसी यांच्यामध्ये मॅरिटल रेप सीन चित्रीत करण्यात आला असून यावर मानसी हिने नुकताच झालेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मानसी हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सिनेमातील मॅरिटल रेप सीनवर अभिनेत्री म्हणाली, ‘नक्कीच धक्कादायक दृश्य आहे… लग्नानंतर अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल… याची कोणी अपेक्षा देखील केली नसेल. पण त्या सीनकडे दुर्लक्ष करत जर, लग्नाआधी येणारं गाणं ऐका… जे इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.’ असं मानसी म्हणाली.

हे सुद्धा वाचा

सिनेमातील बोल्ड सीनवर मानसी हिचं वक्तव्य

पुढे मानसी म्हणाली, ‘माझ्या वैवाहिक आयुष्यात अशा प्रसंगाची मी कल्पना देखील करु शकत नाही. खरा ‘ॲनिमल’ कसा असतो, हेच आम्ही सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमात जर तुम्हाला रणबीर भयानक वाटत असेल तर तुम्ही खलनायक देखील धोकादायक असेल अशी अपेक्षा करू शकता. ‘ असं देखील बॉबी देओल याची तिसरी ऑनस्क्रिन पत्नी म्हणाली आहे. यावेळी मानसी हिने बॉबी देओल याच्या अभिनयाचं देखील कौतुक केलं.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाच्या वादाच्या भोवऱ्यात असताना देखील, चित्रपटगृहात सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जमत आहे. सिनेमाने आतापर्यंत तब्बल जवळपास 400 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आज रविवार असल्यामुळे अभिनेता रणबीर कपूर स्टारर  ‘ॲनिमल’  सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल हे पाहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.