‘ॲनिमल’मुळे झाली नॅशनल क्रश, पण का उडली तृप्ती डिमरी हिची रात्रीची झोप?
Animal fame Tripti Dimri : ‘ॲनिमल’ इंटिमेट सीन साकारल्यामुळे तृप्ती डिमरी हिची रात्रीची झोप देखील उडाली... यामागचं कारण सांगत अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री तृप्ती डिमरी हिच्या वक्तव्याची चर्चा...
मुंबई | 14 डिसेंबर 2023 : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताच सिनेमा प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. पण अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत तृप्ती हिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिची चर्चा रंगली आहे. ‘ॲनिमल’ सिनेमानंतर सर्वत्र “भाभी 2” म्हणून तृप्ती डिमरी हिची ओळख निर्माण झाली आहे. सिनेमामुळे तृप्ती डिमरी हिच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत…असा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘चाहत्यांकडून मला प्रचंड प्रेम मिळत आहे. चाहत्यांकडून मिळणार प्रेम माझ्यासाठी फार खास आहे. एक चांगला अनुभव आहे. माझा फोन सतत वाजत आहे. माझी रात्रीची झोप उडाली आहे कारण चाहत्यांकडून येणारे मेसेज वाचण्याचा माझा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे..’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘सर्वकाही उत्तम आहे आणि चाहत्यांकडून मिळणारं प्रेम माझ्यासाठी फार खास आहे.’ ‘ॲनिमल’ सिनेमात रणबीर आणि तृप्ती यांच्यावर इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. सीनवरून अनेक वाद देखील निर्माण झाले. सोशल मीडियावर देखील रणबीर आणि तृप्ती यांच्या इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे.
इंटिमेट सीन शूट होत असताना तृप्तीला काय विचारायचा रणबीर कपूर?
मुलाखतील तृप्ती हिने शुटिंग दरम्यानच्या अनेक गोष्टी सांगितल्या, अभिनेत्री म्हणाली, ‘रणबीर सतत माझी विचारपूस करायचा. प्रत्येक पाचव्या मिनिटाला रणबीर म्हणायचा, तू ठिक आहेस ना… तू कंफर्टेबल आहेस ना?..’ एवढंच नाही तर इंटिमेट सीन शूट होत असताना सेटवर फक्त 5 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. शिवाय प्रत्येक मॉनिटरची स्क्रिन देखील बंद होती. असं देखील अभिनेत्री म्हणाली.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरी हिची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, तृप्ती हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. तृप्ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.