Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Animal : रणबीर कपूर – तृप्ती डिमरी यांचा इंटिमेट सीन सर्वत्र व्हायरल, पाहून चाहते हैराण

Animal Intimate Scene | 'कुटुंबासोबत पाहात येणारच नाही...', ‘ॲनिमल’ सिनेमातील रणबीर कपूर - तृप्ती डिमरी यांच्या इंटिमेट सीनची सर्वत्र चर्चा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘ॲनिमल’ सिनेमा आणि दोघांच्या इंटिमेट सीनची चर्चा.. पाहून चाहते हैराण

Animal : रणबीर कपूर - तृप्ती डिमरी यांचा इंटिमेट सीन सर्वत्र व्हायरल, पाहून चाहते हैराण
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 10:54 AM

मुंबई | 3 मुंबई 2023 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. सिनेमातील रणबीर कपूर याचा भयानक अंदाज आणि अभिनेता बॉबी देओल याच्या विरोधी भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवरील सिनेमाची कमाई पाहाता, प्रेक्षक सिनेमा पाहाण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत, तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि अभिनेत्री तृप्टी डिमरी यांचा इंटिमेट सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ सिनेमा ‘ए’ रेटेड सिनेमा आहे. सिनेमात आनेक हिंसाचाराचे सीन आहे. पण तृप्ती डिमरीसोबतचा रणबीर कपूरचा रोमँटिक सीनही सिनेमाचा मुख्य आकर्षण ठरला आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे.

सिनेमात दोघांमध्ये बोल्ड सीन शूट करण्यात आले आहे. ज्यामुळे प्रेक्षक देखील हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

एक नेटकरी पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘ॲनिमल सिनेमात असे काही सीन आहेत, ज्यामुळे सर्वत्र सिनेमाचा विषय चर्चेत आहे.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘इंटिमेट सीनमुळे हा सिनेमा कुटुंबासोबत पाहाता येणारा नाही…’ तर तिसरा नेटकरी म्हणाला, ‘रणबीर आणि तृप्ती यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे…’ एवढंच नाही तर, रुपेरी पडद्यावर रणबीर आणि तृप्ती यांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे.

‘ॲनिमल’ सिनेमाची कमाई

प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी ‘ॲनिमल’ सिनेमाने 63 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी देखील सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरला आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाने तब्बल 66 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमाने आतापर्यंत जवळपास 129 कोटी रुपयांचा गल्ला जमा केल्याची माहिती समोर येत आहे. अशात येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....