‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर तृप्ती डिमरीच्या आयुष्यात मोठे बदल, बसणार नाही विश्वास
Tripti Dimri Life after Animal film: 'ॲनिमल' सिनेमामुळे तृप्ती डिमरी हिचा बॉलिवूडमध्ये बोलबाला, प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकत केला मोठा टप्पा पार... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरी हिची चर्चा...
Tripti Dimri Life after Animal film: अभिनेत्री तृप्ती डिमरी गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘ॲनिमल’ सिनेमानंतर तृप्ती हिच्या आयुष्यात अनेक मोठं बदल झाले आहे. ‘ॲनिमल’ सिनेमातील तृप्तीची भूमिका फार लहान आहे. पण त्याच सीनमुळे अभिनेत्री नॅशनल क्रश झाली. सिनेमातील मुख्य अभिनेत्री नसली तरी, अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘ॲनिमल” सिनेमामुळे तृप्ती डिमरी हिला चाहते ‘भाभी 2’ नावाने ओळखू लागले.
‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर तृप्तीचे अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. अशातं संधीचा फायदा घेत अभिनेत्रीने स्वतःच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. अभिनेत्री स्वतःची फी दुप्पट केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती हिने स्वतःचं मानधन 6 कोटींवरून 10 कोटी केलं आहे. सांगायचं झालं तर, तृप्तीच्या मानधना पुढे आता अभिनेत्री जान्हवी कपूर हिचं मानधन देखील कमी आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूर एका सिनेमासाठी 3 कोटी रुपये मानधन घ्यायची. पण आता अभिनेत्रीने स्वतःचं मानधन वाढवलं आहे. जान्हवी आता एका सिनेमासाठी 5 कोटी मानधन घेते. म्हणजे जान्हवीच्या तुलनेत तृप्तीचं मानधन अधिक आहे.
View this post on Instagram
तृप्ती हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमानंतर तृप्ती, अभिनेता विकी कौशल याच्यासोबत ‘बॅड न्यूज’ सिनेमात दिसली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली. नुकताच, तृप्ती आणि अभिनेता राजकुमार राव फेम ‘विकी विद्या का वो वाला वीडियो’ सिनेमाची ट्रेलर प्रदर्शित झाला. 11 ऑक्टोबर रोजी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 3’ सिनेमात देखील तृप्ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अडवाणी ‘भूल भुलैया 2’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी दिसली होती. आता कियारा हिला तृप्तीने रिप्लेस केलं आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.