तो मुस्लिम असल्याने..; एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपविषयी अनिताने सोडलं मौन

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अनिता हसनंदानी एकेकाळी एजाज खानला डेट करत होती. या नात्याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. एजाज मुस्लिम असल्याने आईची नात्याला सहमती नसल्याचा खुलासा तिने केला.

तो मुस्लिम असल्याने..; एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपविषयी अनिताने सोडलं मौन
Anita Hassanandani and Eijaz KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 1:54 PM

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अनिता ही लग्नापूर्वी अभिनेता एजाज खानला डेट करत होती. त्याचं मन जिंकण्यासाठी स्वत:ला बदलण्याबद्दल तिने पश्चात्ताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे एजाजची धार्मिक पार्श्वभूमी पाहता माझ्या आईचंही आमच्या नात्याला विरोध होता, असाही खुलासा अनिताने केला. अनिताने 2013 मध्ये रोहित रेड्डीशी लग्न केलं. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत अनिताला एजाजसोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. एजाजसुद्धा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘बिग बॉस’मध्ये भाग घेतल्यानंतर त्याचं नातं अभिनेत्री पवित्रा पुनियासोबत जोडलं गेलं होतं.

“माझ्या आयुष्यातील काही दीर्घकाळ चाललेल्या रिलेशनपैकी एक एजाजसोबतचं रिलेशनशिप होतं. मी माझ्या आईविरोधात जाऊन त्याच्यावर प्रेम करू लागले होते. तो दुसऱ्या धर्माचा असल्याने आईचा आमच्या नात्याला विरोध होता. तो मुस्लिम आणि मी हिंदू आहे. तिने थेट कधी मला नकार दिला नाही, पण नेहमीच ती काळजी व्यक्त करायची. एजाज आणि मी एकमेकांसाठी चांगले नव्हतो. त्यामुळे आमचं नातं टिकलं नाही”, असं अनिता म्हणाली. एजाजसोबतचं ब्रेकअप खूप कठीण होतं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी वर्षभराचा काळ लागल्याचंही तिने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

याविषयी अनिता पुढे म्हणाली, “जर एखादी व्यक्ती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर ते प्रेम नाही. मला ही गोष्ट तेव्हा समजली नव्हती, कारण मी त्याच्या प्रेमात वेडी होती. ज्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे, त्याच्यासाठी बदलण्यासाठी मी पूर्णपणे तयार होते. पण त्या गोष्टीचा मला आता पश्चात्ताप होतो. त्या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी मला वर्षभराचा काळ लागला. मला इतका एकटेपणा जाणवत होता की अखेर मी माझ्या मैत्रिणीसोबत तिच्या घरात राहू लागले.”

एजाजसोबतच्या नात्यात असताना कोणत्या गोष्टी खटकल्या, असा प्रश्न विचारला असता अनिताने सांगितलं, “सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला बदलू पाहते, त्याच्यासोबत अजिबात राहू नका. त्यांचा फोन वेळोवेळी तपासत राहा, कारण हे सर्वांत महत्त्वाचं असतं. जर ती व्यक्ती स्वत:चा फोन लपवत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड असते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून आणि मित्रमैत्रिणींपासून दूर नाही केलं पाहिजे. तुम्हाला समतोल साधावं लागतं.”

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.