मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : ‘कच्चा बदाम’ या सोशल मीडियावर तुफान गाजलेल्या गाण्यावर डान्स करत प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अंजली कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर अंजली हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अंजली कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. अंजली हिने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून करियरला सुरुवात केली. त्यानंतर अंजली ‘लॉक अप’ या शोमुळे चर्चेत आली. आपल्या क्यूट पण ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अंजली हिच्या नावाची मुनव्वर फारुकी याच्यासोबत तुफान चर्चा रंगली..
मुनव्वर फारुकी याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असलेल्या अंजली हिने वडिलांचं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. अंजली हिने वडिलांना एक खास गिफ्ट दिलं आहे. अंजली नुकताच कामानिमित्त श्रीलंकेला गेली होती अंजली ७ ऑगस्ट रोजी भारतात पुन्हा परतली. आता अंजली हिने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
अंजली हिने वडिलांना नवीन कार गिफ्ट म्हणून दिली आहे. सोशल मीडियावर अंजली हिने पोस्ट केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अंजली तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. दोघे कारसोबत पोझ देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अंजली अरोरा हिने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
अंजली अरोराला सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळाली. ‘कच्चा बदाम’ गाण्यावरील डान्समुळे रातोरात प्रकाशझोतात आल्यानंतर अंजलीला ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोची ऑफर मिळाली. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले होते.
अंजली आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी यांच्यातील नातं लोकांना खूप आवडलं आणि दोघांच्या नावाने हॅशटॅगही बनवण्यात आला. इतकंच नव्हे तर अंजलीने मुनव्वरला प्रपोजही केलं होतं. मात्र शो संपल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. काही दिवसांपूर्वी अंजली तिच्या एमएमएस व्हिडीओ लीकमुळेही चर्चेत आली होती.