Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साऊथ सुपरस्टारने स्टेजवर ढकलल्याच्या घटनेवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली..

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार नंदमुरी बालकृष्ण हे त्यांच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. या व्हिडीओमुळे त्यांच्यावर बरीच टीका होतेय. बालकृष्ण यांनी एका कार्यक्रमात स्टेजवर असलेल्या अभिनेत्रीला सर्वांसमोर ढकललं.

साऊथ सुपरस्टारने स्टेजवर ढकलल्याच्या घटनेवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली..
Nandamuri BalakrishnaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 9:46 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नंदमुरी बालकृष्ण यांच्यावर सोशल मीडियाद्वारे प्रचंड टीका होत आहे. एका कार्यक्रमातील त्यांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्यांनी एका अभिनेत्रीला ढकलल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्री अंजलीच्या आगामी चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात ते मुख्य पाहुणे म्हणून पोहोचले होते. मात्र स्टेजवर त्यांनी सर्वांसमोर अंजलीला रागात ढकललं. या व्हिडीओवर अखेर अंजलीने मौन सोडलं आहे. अंजलीने याच कार्यक्रमातील व्हिडीओ तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओ क्लिपमध्ये नंदमुरी बालकृष्ण आणि अंजली हे एकमेकांशी बोलताना, हाय-फाइव्ह देताना, हसताना दिसत आहेत. त्याचसोबत नंदमुरी अंजलीला ढकलतानाही दिसत आहेत. नंदमुरी जरी रागात ढकलले तरी अंजली मात्र ती घटना हसण्यावारी घेते. या क्लिपच्या कॅप्शनमध्ये अंजलीने लिहिलंय, ”गँग्स ऑफ गोदावरी’ या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मी बालकृष्ण यांची खूप आभारी आहे. मला याविषयी व्यक्त व्हायचंय की बालकृष्ण आणि माझ्यात एकमेकांविषयी खूप आदर आहे. फार आधीपासून आमच्यात चांगली मैत्री आहे. त्यांच्यासोबत पुन्हा एकदा स्टेज शेअर करण्याचा अनुभव अप्रतिम होता.’

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं होतं?

बालकृष्ण जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा ते बाजूला उभ्या असलेल्या अंजलीला सरकरण्यास सांगतात. त्यानंतर अंजली थोडी सरकते, पण इतक्यात बालकृष्ण रागाने तिला ढकलतात. स्टेजवर अंजली आणि बालकृष्ण यांच्यामध्ये अभिनेत्री नेहा उभी असते. अंजलीला ढकलल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य सहज दिसून येतंय. मात्र अंजली जोरात हसते आणि बाजूला सरकते. यावेळी मंचावर मागे उभे असलेले इतर काहीजणसुद्धा बालकृष्ण यांच्या या कृत्यावर हसतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी आणि इतर सेलिब्रिटींकडूनही बालकृष्ण यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनीसुद्धा बालकृष्ण यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोण आहे हा लबाड माणूस?’, अशी संतापजनक कमेंट त्यांनी या व्हिडीओवर केली आहे. बालकृष्ण यांचा स्वभावच तसा आहे, असं म्हणत काही नेटकऱ्यांनी त्यांचं समर्थन केलं. अशा नेटकऱ्यांच्या कमेंटवर हंसल मेहता यांनी लिहिलं, ‘लबाड x100.’ अभिनेता नकुल मेहतानेही बालकृष्ण यांच्यावर टीका केली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार.