अंकिता लोखंडे हिचे नॅशनल टेलिव्हिजनवरील चाळे पाहून लोक हैराण, मोठी खळबळ, थेट
अंकिता लोखंडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तिने काही बाॅलिवूड चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
मुंबई : बिग बॉस 17 मध्ये मोठा हंगामा बघायला मिळतोय. नुकताच अंकिता लोखंडे हिने पती विकी जैन याच्यावर गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर विकी जैन याला थेट अंकिता म्हणाली की, तू माझा वापर केलाय. नुकताच आता बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये वाद झालाय. यावेळी अंकिता लोखंडे हिने असे काही केले की, सर्वजण हैराण झाले. अंकिता लोखंडे हिचे हे वागणे पाहून चाहते देखील हैराण झाले.
भांडणामध्ये चक्क अंकिता लोखंडे हिने शिवी देत थेट मधले बोट अभिषेक याला दाखवले. अंकिता लोखंडे हिने केलेले हे चाळे पाहून अभिषेक कुमार याचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळाले. यानंतर तो थेट म्हणाला की, मी जर असे कृत्य केले असते तर मला सगळ्यांनी सुनावले असते. मात्र, ती अंकिता लोखंडे असल्याने तिला कोणीच काही बोलू शकत नाही. मी असे केले असते तर खूप मोठा मुद्दा घरातील सदस्यांनी बनवला असता.
अंकिता लोखंडे हिला कोणीच काहीही बोलू शकत नाही. अंकिता लोखंडे आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये घरातील कामामुळे वाद सुरू होता. यानंतर अंकिता आणि अभिषेकमध्ये वाद वाढतो. यानंतर अभिषेक याला शांत राहण्यास विकी जैन हा सांगतो. मात्र, त्यानंतर थेट अंकिता मधले बोट अभिषेक याला दाखवते आणि त्यानंतर वाद वाढतो.
Sophisticated #AnkitaLokhande can only crib cry and show middle Finger 🖕🏻..! This is all about a looser quality..!-and Correctly said by @Abhishekkuma08 if it would have been any male instead of her all would have pounced ..! Sham€ on everyone..no one took stand for this 🤮🤢… pic.twitter.com/UjQ5cVY2hO
— डेऽटीNII (@DestinyyyBoss) November 14, 2023
आता अभिषेक कुमार आणि अंकिता लोखंडे यांच्यामधील वाद हा वाढताना दिसतोय. बिग बॉस 17 च्या घरातील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून अंकिता लोखंडे हिचे नाव चर्चेत येताना दिसत आहे. मोठा गेम प्लॅन करून अंकिता लोखंडे ही घरात आल्याचे बघायला मिळत आहे. कारण फुटेजमध्ये राहण्यासाठी अंकिता आणि विकी जैन नाटक करत असल्याचे सांगितले जाते. कारण नसताना देखील हे भांडणे करताना दिसत आहेत.
बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी मोठा गेम करत थेट विकी जैन याला दिलवाल्या रूममधून बाहेर काढले. पुढील काही दिवसांमध्ये मोठे हंगामे बिग बॉस 17 मध्ये होताना दिसतील. सलमान खान याने रागावल्यानंतर ऐश्वर्या शर्मा ही शांत राहताना बिग बॉस 17 मध्ये दिसत आहे. मनारा चोप्रा ही सध्या बिग बॉस 17 मध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. चाहते हे मनारा चोप्रा हिला प्रेम देताना दिसत आहेत.