अंकिता लोखंडेनं मोडला ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वांत मोठा नियम; काय होणार शिक्षा?

अभिनेत्री अंकिता लोखंडेकडून बिग बॉसच्या घरात एक मोठी चूक झाली आहे. या चुकीची शिक्षा बिग बॉसने कॅप्टनला ठरवायला सांगितली आहे. त्यामुळे कॅप्टन मुनव्वर फारुखी तिच्याबद्दल कोणता निर्णय घेतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अंकिता लोखंडेनं मोडला 'बिग बॉस'च्या घरातील सर्वांत मोठा नियम; काय होणार शिक्षा?
अंकिता लोखंडेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 9:12 PM

मुंबई : 14 डिसेंबर 2023 | बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांना विशेष सुविधा मिळत असल्याची तक्रार याआधीही इतर स्पर्धकांनी केली होती. आता नुकत्याच एका एपिसोडमध्ये अंकिताने बिग बॉसच्या घरातील मोठा नियम मोडला आहे. त्यामुळे आता अंकितावर कोणती कारवाई करायची किंवा तिला कोणती शिक्षा द्यायची याचा निर्णय मुनव्वर फारुखीने घेण्याचे आदेश बिग बॉसने दिले आहेत. बुधवारी बिग बॉसचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. बिग बॉसच्या घरात जे डॉक्टर अंकितावर उपचार करण्यासाठी आले होते, त्यांच्याकडून तिने घराबाहेरची माहिती घेतल्याचा खुलासा या प्रोमोमध्ये झाला. त्यानंतर बिग बॉस मुनव्वरला थेरपी रुममध्ये बोलावतात आणि त्याला डॉक्टर-अंकितामधील संवादाचा रेकॉर्डिंग दाखवतात. बिग बॉसच्या घरातील मोठा नियम मोडल्याप्रकरणी अंकितावर काय कारवाई करायची याचा निर्णय तू घे, असंही ते मुनव्वरला सांगतात.

या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अंकिताला शिक्षा देण्याचा अधिकार मुनव्वरला दिल्याच्या निर्णयाला काही नेटकऱ्यांनी विरोध केला आहे. तर काहींनी अंकिताला तिच्या वागणुकीवरून ट्रोल केलंय. ‘बिग बॉसच्या घरातील या सर्वांत फेक महिलेला कॅप्टनने काढून टाकावं’, असं एकाने लिहिलं. तर ‘आता निर्माते उघडपणे मुनव्वरची बाजू घेत आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘वाईट कल्पना आहे ही. सर्वांत आधी बिग बॉसने तिला ही खास सुविधा दिलीच पाहिजे नव्हती’, असंही अनेकजण म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडला होता. या टास्कमध्ये मुनव्वर फारुकीने मन्नारा चोप्राला हरवलं होतं. कॅप्टन बनताच मुनव्वरने सर्वांत आधी स्पर्धकांचे रुम्स बदलले आणि सर्व रुम्समध्ये खाण्यापिण्याचं सामान एकाच प्रमाणात वाटलं जावं, असा निर्णय घेतला. या आठवड्यात नील भट्टसोबतच खानजादी, विकी जैन आणि अभिषेक कुमार यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. या चौघांपैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.