बुद्धी भ्रष्ट झाली आहे हिची…, अंकिता लोखंडेला हिजाबमध्ये पाहताच भडकले चाहते, व्हिडीओ व्हायरल
अंकिता लोखंडेला हिजाबमध्ये पाहताच भडकले चाहते. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत म्हणाले, 'बुद्धी भ्रष्ट झाली आहे हिची...', अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल... व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अंकिता हिने फक्त मालिकांमध्ये नाही तर, अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. पण आता अभिनेत्री तिच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही तर, एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अंकिताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये अंकिताला पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. तर काही चाहत्यांनी अभिनेत्रीचं कौतुक देखील केलं. व्हिडीओमध्ये अंकिता एका विमानतळावर असल्याचं दिसत आहे . पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये अंकिता सुंदर दिसत आहे. पण तिने घातलेल्या हिजाबने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अंकिताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांनी अंकिताचं कौतुक केलं तर, अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अंकिताच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ ankitalokhandefp या इंस्टारग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
View this post on Instagram
अंकिताच्या व्हिडीओवर कमेंट करत एक चाहता म्हणाला, ‘बुद्धी भ्रष्ट झाली आहे हिची…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पागल औरत…’ अनेक सोशल मीडिया यूजर अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. अंकिता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
अंकिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ मध्ये देखील अभिनेत्रीने चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं. शोमध्ये अभिनेत्री कायम एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल बोलायची… बिग बॉसच्या घरातील अभिनेत्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
View this post on Instagram
अंकिता लोखंडे देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्री पती विकी जैन याच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. चाहते देखील अंकिताच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.