बाहेर जा, हे ठीक नाही.. पापाराझींवर का भडकली अंकिता लोखंडे?
अभिनेत्री अंकिता लोखंडेचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अंकिताचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी पोहोचले होते. यावेळी पापाराझींसमोर अंकिता भडकलेली दिसली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस 17’च्या वेळी तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत होती. बिग बॉसनंतर आता अंकिता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 22 मार्च रोजी तिचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ती पती विकी जैन, इतर कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत पोहोचली होती. मात्र यावेळी अंकिता पापाराझींवर भडकली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकितासोबत बिग बॉस फेम खानजादी आणि अभिषेक कुमार थिएटरच्या दरवाज्यातून आत जात असतात. त्यावेळी पापाराझी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करत असतात. मात्र अचानक अंकिता पापाराझींवर भडकते.
अंकिता पापाराझींना म्हणते, “चित्रपट सुरू झाला आहे, तुम्ही बाहेर जा. प्लीज.. हे योग्य नाही. खरंच हे खूप चुकीचं आहे. आतमध्ये चित्रपट सुरू झाला आहे.” पापाराझींवर भडकल्यानंतर अंकिता थिएटरमध्ये जाते. तिचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘अंकिताला खूप जास्त ॲटिट्यूड आहे’, असं एकाने म्हटलं. तर ‘बिग बॉसनंतर अंकिता अधिकच घमंडी झाली आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. तर काहींनी अंकिताची बाजू घेत पापाराझींवर टीका केली आहे. ‘तिच्या रागाचं कारण योग्य आहे’, असं काहींनी म्हटलंय.
View this post on Instagram
रणदीप हुडाची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात अंकिता लोखंडेनं यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने काहीच मानधन घेतलं नाही. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचं शूटिंग लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी पार पडलं. या बायोपिकच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
स्क्रिनिंगनंतर जेव्हा पापाराझींनी अंकिताच्या सासूला तिच्या अभिनयाविषयी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, “अंकिता तर नेहमीच चांगली दिसते. आमची अंकिता एकदम ए वन आहे.” अंकिताने कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘बागी 3’मध्ये भूमिका साकारली होती.