‘या’ अभिनेत्रीने प्रेग्नंसीबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली, ‘तो’ काळ माझ्यासाठी नक्कीच..
अंकिता लोखंडे ही कायमच चर्चेत असते. अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अंकिता लोखंडे आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अंकिता लोखंडे ही पतीसोबत बिग बाॅसच्या घरात देखील सहभागी झाली होती.
अंकिता लोखंडे हिने एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. तिला खरी ओळख ही टीव्ही मालिकेमधूनच मिळालीये. मालिकांनंतर अंकिता लोखंडे हिने आपला मोर्चा थेट चित्रपटांकडे वळवला. काही चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका देखील अंकिता लोखंडेने केल्या. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅसमध्ये सहभागी झाली. मात्र, यावेळी म्हणावा तसा गेम खेळतानाअंकिता दिली नाही. उलट बिग बाॅसच्या घरात असताना अंकिता लोखंडे आणि तिच्या पतीमध्ये जोरदार वाद बघायला मिळाला.
हेच नाही तर मध्यंतरी जोरदार चर्चा रंगताना दिसली की, अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे घटस्फोट घेऊ शकतात. बिग बाॅसच्या घरात असताना यावर थेट भाष्य करताना अंकिता लोखंडे ही दिसली होती. ज्यानंतर अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. विकी जैनच्या आईने देखील अंकिता लोखंडेला खडेबोल सुनावले होते.
आता नुकताच दिलेल्या मुलाखतीमुळे अंकिता लोखंडे ही तूफान चर्चेत आलीये. अंकिता लोखंडे ही पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नंसी आणि बाळाबद्दल बोलताना दिसलीये. अंकिता लोखंडे म्हणाली की, मी आणि विकी नेहमीच बाळाबद्दल चर्चा करतो. आमचे बाळ आमच्या नात्याचे भविष्य आहे. ज्यावेळी मला बाळाबद्दल प्रश्न विचारला जातो, त्यावेळी मला खूप छान वाटते.
तो काळ आम्हाला नक्कीच जगायचा असल्याचे देखील अंकिता लोखंडे हिने म्हटले आहे. अंकिता लोखंडे ही पुढे म्हणाली की, मला माझ्या बाळासोबतच्या अनेक आठवणी लाईफ टाईमसाठी जपून ठेवायच्या आहेत. मला प्रत्येक क्षणाचा व्हिडीओ तयार करायचा आहे. ज्यावेळी आम्ही म्हातारे होणार, त्यावेळी मुलांना समजले पाहिजे ना आपले आई वडिल कसे होते.
मी माझ्या मुलांच्या आठवणी मेलवर ठेवणार आहे, ज्यावेळी ते 18 वर्षांचे होतील तेंव्हा मी त्यांना पासवर्ड देणार असेही अंकिताने म्हटले आहे. लवकरच आता बेबी प्लनिंग अंकिता लोखंडे ही करू शकते हे स्पष्ट आहे. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अंकिता लोखंडे ही दिसते.