तब्बल इतके रुपये भरून अंकिता लोखंडे-विकी जैन सोडणार ‘बिग बॉस 17’?

सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक, प्रेमळ फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करणारे अंकिता लोखंडे-विकी जैन बिग बॉसच्या घरात मात्र सतत भांडताना दिसत आहेत. याच भांडणांना कंटाळून अखेर हे दोघं शो सोडणार का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. याविषयी खुद्द विकी काय म्हणाला, ते वाचा..

तब्बल इतके रुपये भरून अंकिता लोखंडे-विकी जैन सोडणार 'बिग बॉस 17'?
Ankita Lokhande and Vicky Jain Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 10:15 AM

मुंबई : 15 नोव्हेंबर 2023 | छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’ हा अभिनेत्री अंकिता लोखंडेसाठी फारच त्रासदायक ठरतोय. अंकिताचा पती विकी जैनला नुकतंच ‘दिमाग’ विभागाच्या घरात हलवलं गेलं, तर दुसरीकडे स्वत: अंकिता ‘दिल’ विभागातील घरात राहत आहे. मात्र पतीपासून झालेला हा दुरावा तिला सहन होत नाहीये. अंकिताने विकीसमोर आपल्या मनातील खदखद मोकळेपणे बोलून दाखवली. इतकंच नाही तर तिने हेसुद्धा कबूल केलं की तिने विकीला या शोमध्ये तिच्यासाठी आणि तिच्या खेळीसाठी घेऊन आली आहे. बिग बॉसच्या घरात एकटेपणा जाणवत असल्याची भावना तिने व्यक्त केली.

बिग बॉसच्या घरात दररोज अंकिता आणि विकीमध्ये नवा वाद पहायला मिळतोय. एकीकडे अंकिता विकीपासून दूर गेल्याने नाराज होती, तर दुसरीकडे विकी मात्र इतरांसोबत खुश होता. हे सर्व पाहून अंकिताचा पारा चढला आणि रागाच्या भरात ती विकीला बरंवाईट बोलून गेली. “तू माझा फक्त वापर केलास” असंही ती थेट पतीला म्हणाली. अंकिताने बिग बॉसच्या घरात अशा पद्धतीने न राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि घरी परत जाण्याचा आग्रह केला.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरात पतीकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने आणि दररोज नवनवीन भांडणं होत असल्याने अंकिताच्या संयमाचा बांध तुटला. हे पाहून विकीने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. अंकिताला विकीने शांतपणे समजावलं आणि त्यानंतर तिला तिची चूकसुद्धा समजली. थोड्या वेळानंतर दोघांमधील वाद मिटला आणि ते पुन्हा एकत्र आले. मात्र जेव्हा अंकिताने अचानक म्हटलं की ती सामना करू शकत नाही आणि तिला बाहेर जायचं आहे. तेव्बा विकीनेही चार कोटी रुपये बिग बॉसला भरून शो सोडण्याचा पर्याय सांगितला.

अंकिताच्या एकंदर वागण्यावरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बॉसमधील घरांच्या शिफ्टींगवरून अंकिताने प्रमाणापेक्षा अधिक वाद निर्माण केला, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर काहींनी अंकिता आणि विकीमधील भांडणं म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलंय. पण येत्या काळात वाढता वाद पाहता अंकिता आणि विकी बिग बॉसला पैसे भरून शो खरंच सोडतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.