Ankita Lokhande | अंकिता लोखंडे रडली ढसाढसा, थेट म्हणाली, मला घरी जायचंय, वाचा काय घडले नेमके
अंकिता लोखंडे हिने एक अत्यंत मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. अंकिता लोखंडे ही कायमच चर्चेत असते. अंकिता लोखंडे हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) ची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्येही मोठे क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 हे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नक्कीच ठरलंय. बिग बॉस (Bigg Boss) 17 टीआरपीमध्ये धमाका करताना दिसेल. या सीजनकडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. बिग बॉस 17 मध्ये सर्वाधिक फिस घेणारी सदस्य अंकिता लोखंडे ही ठरलीये. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन हिच्यासोबत सहभागी झालीये.
बिग बॉस 17 च्या घरात पहिल्याच दिवशी मोठा घमासान झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर घरातील सदस्य हे एकमेकांच्या अंगावर देखील गेले. यावेळी बिग बॉस चांगलेच सक्रिय दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये धमाका होणार हे नक्कीच आहे. बिग बॉस 17 ऐश्वर्या शर्मा ही पती निल भट्ट याच्यासोबत सहभागी झाली.
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओ मध्ये अंकिता लोखंडे ही ढसाढसा रडताना दिसतंय. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे ही विकी जैन याच्या काही गोष्टींना कंटाळल्याचे बघायला मिळतंय. बिग बाॅस 17 ला अजून एक आठवडा देखील झाला नसताना अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये खटके उडताना दिसत आहेत.
अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याला म्हणते की, तू मला घरून येताना स्पष्ट सांगितले होते की, आपण एकत्र राहू…मला कोणीही दुखवू शकत नाही, फक्त मला माझी माणसेच दुखवू शकतात आणि खरोखरच याचा मला त्रास नक्कीच होतोय. मला खूप एकटे झाल्यासारखे वाटतंय. तू सगळीकडे वेळ देतोय, फक्त मला नाही.
विकी मला खरोखरच हे जाणवतं की, तू माझ्यासोबत नाहीयेस. अंकिता पुढे म्हणते की, नव्या लोकांसमोर तू जुन्या लोकांना विसरून जातोय. मला घरी जायचे आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे सर्वाधिक चर्चेत असलेले घरातील सदस्य आहेत. मात्र, म्हणावा तसा गेम खेळताना अंकिता लोखंडे ही घरात दिसत नाहीये. दुसरीकडे मात्र, विकी चांगलाच सक्रिय दिसतोय.