अंकिता लोखंडे हिच्यावर भडकला विकी जैन, थेट काढली लाज, वाचा काय घडले?

| Updated on: Oct 27, 2023 | 9:03 AM

अंकिता लोखंडे ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झालीये. अंकिता लोखंडे ही बिग बाॅसच्या घरात पती विकी जैन याच्यासोबत दाखल झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांच्यामध्ये मोठा वाद हा बघला मिळतोय. आता अंकितावर पती भडकलाय.

अंकिता लोखंडे हिच्यावर भडकला विकी जैन, थेट काढली लाज, वाचा काय घडले?
Follow us on

मुंबई : बिग बॉस 17 हे चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. नुकताच बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे हिचा क्लास विकी जैन याने लावला. यावेळी विकी जैन हा अंकिता लोखंडे हिला आरसा दाखवताना दिसला. इतकेच नाही तर थेट विकी अंकिताला म्हणतो की, तुझ्या या वागण्यामुळे मला लाज वाटत आहे. तू अशाप्रकारचे वागणे कधी बंद करणार? यावेळी विकी हा अंकिताला खडेबोल सुनावताना दिसतोय.

अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 मध्ये पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, बिग बॉस 17 च्या घरात सहभागी झाल्यापासून विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये मोठा वाद हा बघायला मिळतोय. नेहमीच यांच्यामध्ये भांडणे होतात. अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धेक असल्याचे सांगितले जाते.

बिग बॉस 17 च्या घरात अंकिता ही मोठा धमाका करेल, असे सांगितले जात होते. नुकताच अभिषेक आणि विकी जैन हे गार्डन परिसरात गप्पा मारत बसले. मात्र, विकी जैन हा अभिषेक याला बोलत असल्याचे अजिबात अंकिता लोखंडे हिला पटले नाही. कारण बिग बॉस 17 च्या घरात अन्नावरून अभिषेक आणि अंकितामध्ये मोठा वाद झाला.

विकी जैन आणि अभिषेक गप्पा मारत बसलेले असताना अंकिता तिथे जाते आणि वेगळे तोंड करते. हे अभिषेक याच्या लक्षात येते आणि तो तिथून उठून जातो. मग त्यानंतर अंकिता लोखंडे हिला विकी चांगलेच खडेबोल सुनावतो. तो थेट म्हणतो की, हे असे वागणे बंद कर. त्यानंतर अंकिता लोखंडे ही विकीची माफी मागताना देखील दिसत आहे.

या सर्व प्रकारानंतर अंकिता लोखंडे हिला सोशल मीडियावर सुनावले जात आहे. एकाने लिहिले की, विकी जैन हा अगदी बरोबर आहे. दुसऱ्याने लिहिले की, मी या अंकिता लोखंडे हिला फार जास्त समजदार समजत होतो परंतू मी चुकीचा आहे. बिग बॉस 17 मध्ये मोठे भांडणे देखील सतत बघायला मिळत आहेत. बिग बाॅसच्या निर्मात्यांनी नुकताच मोठी खेळी खेळलीये.