‘बिग बॉस 17’मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये घमासान, अभिनेत्रीने थेट आवाजावरच…
बिग बॉस 17 धमाका करताना दिसतोय. नुकताच सलमान खान याने विकेंडच्या वारमध्ये घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावला. अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 मध्ये पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये.
मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बॉस 17 मध्ये सर्वाधिक चर्चेत अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे आहेत. इतकेच नाही तर नेहमीच अंकिता आणि विकीमध्ये मोठे वाद होताना दिसले आहेत. भांडणानंतर नेहमीच अंकिता ही रडताना दिसते. आता नुकताच अंकिता लोखंडे ही विकीबद्दल असे काही बोलते की, सर्वज हैराण होतात. थेट अंकिता म्हणाली की, मला विकीचा आवाज अजिबात आवडत नाही, मी सहनच करून शकत नाही.
अंकिता लोखंडे ही गार्डन परिसरात मुनव्वर फारूकी याच्यासोबत फिरताना दिसत आहे. यावेळी विकी जैन हा रिंकू धवनसोबत गप्पा मारण्यात बिझी आहे. यावेळी अंकिता ही विकीकडे बघत म्हणते की, किडा आहे विकी किडा. त्याला कोणताही विषय सापडला तर तो खूप जास्त बोलतो. विकी आणि माझी घरात कधी भांडणे होऊ नये.
बापरे कारण मी विकी याचा आवाजच सहन करू शकत नाही. विकी इतके जास्त समजावतो की मला असे वाटते की त्याने ज्ञान देणे थांबवायला हवे. मी कधी कधी खूप जास्त कंटाळते. बिग बॉस का 17 मध्ये नेहमीच अंकिती लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद हे बघायला मिळाले. नेहमीच अंकिता विकीवर आरोप करताना दिसते.
काही दिवसांपूर्वी विकी जैन हा अंकिता लोखंडे हिच्यावर चिडताना दिसला. ज्यानंतर याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. ज्यानंतर अनेकांनी विकी जैन याला फटकारले. अंकिता लोखंडे हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत हे देखील अनेक वर्षे एकमेकांना डेट करताना दिसले. मात्र, सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी एकमेकांना डेट करून थेट लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिग बाॅसमध्ये धमाकेदार गेम खेळताना विकी जैन हा दिसतोय.