बिग बॉसच्या घरातील नाटक की खराच पश्चात्ताप? विकीला रेड फ्लॅग म्हणताच अंकिता म्हणाली..

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यात बिग बॉसच्या घरात प्रचंड भांडणं झाल्याची पहायला मिळाली. आता बिग बॉस संपल्यानंतर दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये अंकिता विकीसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

बिग बॉसच्या घरातील नाटक की खराच पश्चात्ताप? विकीला रेड फ्लॅग म्हणताच अंकिता म्हणाली..
अंकिता लोखंडे, विकी जैनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:54 PM

मुंबई : 12 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस 17’मधील प्रवास काही सोपा नव्हता. सलमान खानच्या या शोमध्ये अंकिताचे इतर स्पर्धकांसोबत तर वाद झालेच. पण त्याहीपेक्षा अधिक भांडणं तिची नवऱ्यासोबतच झाली. पती विकी जैन कोणत्याही महिला स्पर्धकासोबत बोलायला लागला की अंकिताला अनेकदा असुरक्षित झाल्याचं पहायला मिळालं. मन्नारा चोप्रा आणि विकी जैन यांची मैत्री तिला खूप खटकली होती आणि यावरूनच तिचे पतीसोबत वाद झाले. या सर्वांत सोशल मीडियावर विकीला ‘रेड फ्लॅग’चा टॅग मिळाला. जो व्यक्ती रिलेशनशिपसाठी योग्य नसतो त्याच्यासाठी ‘रेड फ्लॅग’ची संकल्पना वापरली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “नाही नाही, लोकांचा हा केवळ एक दृष्टीकोन असतो. मला असं वाटतं की जो रेड फ्लॅग आहे आणि रेड फ्लॅगची गोष्ट आहे, तो माझा पती नाही. माझा पती माझ्यासाठी ‘ग्रीन फ्लॅग’च आहे. आमच्यात काहीही झालं असलं तरी, आमची भांडणं झाली असली तरी.. जसं ते म्हणतात ना, एडिटिंगमध्ये कोणत्या गोष्टी फिरवून दाखवल्या जातात, त्यामुळे खरं समोर येत नाही. तुम्ही विकीला भेटलात. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी विकी काय आहे, हे मला नीट माहीत आहे. हेच सर्वांत महत्त्वाचं आहे.”

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरातून विकी अंकिताच्या एक आठवडाआधीच बाहेर पडला होता. त्यावेळी त्याने बाहेर पडताच आयेशा खान, सना रईस खान यांच्यासोबत मिळून घरात पार्टी केली होती. त्यावरून अंकिताचे चाहते विकीवर नाराज होते. याबद्दल अंकिताला प्रश्न विचारला असता ती पुढे म्हणाली, “मी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर काही स्पर्धकांशी भेटले आणि प्रत्येकाशी मी बोलले. आम्ही एकत्र पार्टी केली. जबरदस्ती या पार्ट्यांची हवा केली जातेय. कधी कधी मला स्वत:लाच असं वाटतं की मी हे सगळं का करते? कारण त्याचा परिणाम विकीला भोगावा लागतो. मला त्या गोष्टींचा पश्चात्ताप होतो. कधी कधी अतिभावूकपणा आणि अतिविचार ठीक नसतात.”

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.