जेव्हा थोडक्यात वाचला अंकिता लोखंडेचा जीव; चालत्या ट्रेनमधून उडी मारली अन्..

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक अनुभव सांगितला. संघर्षाच्या दिवसांत लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तेव्हापासून अंकिताने लोकल ट्रेनमधून प्रवास करणं बंदच केलं.

जेव्हा थोडक्यात वाचला अंकिता लोखंडेचा जीव; चालत्या ट्रेनमधून उडी मारली अन्..
Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 1:24 PM

मुंबई : 4 मार्च 2024 | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही महिन्यांपासून ‘बिग बॉस 17’मुळे तुफान चर्चेत होती. बिग बॉसच्या घरात पती विकी जैनसोबतच्या सततच्या भांडणांमुळे ही जोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. यावरून अंकिता आणि विकीला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोलसुद्धा केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता तिच्या संघर्षाविषयी व्यक्त झाली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात लोकल ट्रेनने प्रवास करतानाचा एक भयंकर अनुभव तिने सांगितला. या प्रवासादरम्यान अंकिता थोडक्यात वाचली होती.

या मुलाखतीत अंकिताने सांगितलं की तिने मुंबई लोकलने प्रवास करणं हळूहळू बंदच केलं होतं. कारण ती एकदा चालत्या ट्रेनमधून पडली होती. अंकिता म्हणाली, “मला लोकल ट्रेनने प्रवास करायला खूप भिती वाटते. एकदा मी लोकल ट्रेनमधून पडली होती. चर्चगेटहून प्रवास करताना मी चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होती, त्याचवेळी ही दुर्घटना घडली. मी चर्चगेटहून सुटणाऱ्या जलद लोकलमध्ये चढली आणि माझे मित्रमैत्रिणी धीम्या गतीच्या ट्रेनमध्ये चढले. त्यांनी मला उतरायला सांगितलं पण तितक्यात माझी ट्रेन सुरू झाली. तरीसुद्धा मी ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. जशी मी चालत्या ट्रेनमधून उतरले, तशी मी खाली पडली. सुदैवाने मला फार लागलं नव्हतं. पण तो माझा लोकलचा शेवटचा प्रवास होता. तसंही मला लहानपणापासून लोकल ट्रेनने प्रवास करायला खूप भीती वाटायची.”

हे सुद्धा वाचा

अंकिता ही मूळची मध्यप्रदेशमधील इंदूर इथली आहे आणि गेल्या वीस वर्षांपासून ती मुंबईत राहतेय. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली आणि इथेच आपल्या कुटुंबीयांसोबत स्थायिक झाली. सध्या अंकिता ही पती विकी जैनसोबत मुंबईतल्या आलिशान बंगल्यात राहते. ‘पवित्र रिश्ता’ या पहिल्यावहिल्या मालिकेतून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.