‘रात्रभर पार्टीनंतर मी झोपायची आणि सुशांत…’, आंकिता लोखंडे हिचं पुन्हा सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल मोठं वक्तव्य
Ankita Lokhande : 'एम एस धोनी...' सिनेमा दरम्यान सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत नक्की काय झालं होतं? अंकिता लोखंडे हिच्याकडून मोठं सत्य समोर....; अंकिता हिच्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ... तेव्हा नक्की झालं तरी काय होतं?
मुंबई | 6 डिसेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 17’ शोची चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस शो उतरताना दिसत आहे. अशात अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील शोमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. अंकिता सतत दिवंगत अभिनेता आणि एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल बोलताना दिसते. आता देखील अभिनेत्री सुशांत याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘एम एस धोनी’ सिनेमा दरम्यान नक्की काय झालं होतं… याबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांच्यासोबत संवाद साधत असताना सुशांत याच्याबद्दल अंकिता म्हणाली, ‘जेव्हा सुशांता याचा पहिला ‘काय पो चे’ सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा मी प्रचंड रडली होती. तेव्हा मला सुशांत याच्यावर अभिमान आणि गर्व वाटत होता. सुशांत याने त्याच्या पहिल्या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली होती…’
#Ankitalokhande talking about Sush that he is so hard working, mujhe vishwas tha ki vo karlega, She also said that Our relationship lasted for 7 years. Also talked about #SSR #MSD #BB17 #BiggBoss17 #AnkitaIsTheBoss #AnkuHolics #SushantSinghRajput𓃵 #AnkitaLokhande𓃵 pic.twitter.com/bFOjCVzTGU
— Krishna Sharma (@Iakrishnasharma) December 5, 2023
पुढे ‘एम एस धोनी’ सिनेमाबद्दल अंकिता म्हणाली, ‘एम एस धोनी सिनेमा दोन वर्षांसाठी पोस्टपोन झाला होता. या दोन वर्षात सुशांत याने प्रचंड मेहनत केली. आम्ही रात्रभर पार्टी करायचो… पार्टीनंतर मी झोपाण्यासाठी निघून जायची. पण सुशांत सकाळी 6 वाजता क्रिकेट खेळायला जायचा… 2 वर्ष सुशांत फक्त क्रिकेट खेळत होता. तो खूप हार्डवर्किंग आणि मेहनती होता…’ असं अंकिता लोखंडे म्हणाली…
अंकिता हिच्यासोबत कसं होतं सुशांत याचं नातं
सुशांत याच्यासोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘सुशांत आणि मी सात वर्ष एकत्र होतो. पण सात वर्षांत त्याने माझ्यासोबत कधीच गैरवर्तन केलं नाही. मला वाईट वागणूक दिली नाही. आमची भांडणं व्हायची.. पण कधीच आमच्यात मोठी भांडणं झाली नाहीत…’ ‘बिग बॉस’मध्ये अंकिता सतत सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल बोलताना दिसते.
‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये प्रेम बहरलं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगू लागल्या होत्या. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सुशांत याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता हिच्या आयुष्यात विकी जैन याची एन्ट्री झाली. 2021 मध्ये अंकिता आणि विकी यांनी लग्न केलं.
सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही चाहते आणि अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याला विसरु शकले नाहीत. सुशांत याचे जुने व्हिडीओ आणि फोटो आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अभिनेत्याचे सिनेमे देखील चाहते आजही तितक्याच आवडीने पाहातात.