‘बिग बॉस 17’नंतर अंकिता-विकीचा घटस्फोट अटळ? नव्या प्रोमोमुळे चाहत्यांकडून चिंता व्यक्त

बिग बॉसच्या घरात काही वेळा दोन जण एकत्र आले, तर या घरातून बाहेर पडताना काहींच्या नात्यात कायमचा दुरावा आला. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून बरेच चढउतार पहायला मिळत आहेत. आता अंकिताने असं काही म्हटलंय, की ज्यामुळे दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होऊ लागली आहे.

'बिग बॉस 17'नंतर अंकिता-विकीचा घटस्फोट अटळ? नव्या प्रोमोमुळे चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Ankita Lokhande and Vicky JainImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 1:18 PM

मुंबई : 12 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक स्पर्धकाच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. बाहेरच्या जगाशी कोणताच संपर्क न ठेवता बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धकाशी जुळवून घेत स्पर्धेत टिकून राहणं खूप आव्हानात्मक असतं. अशातच जवळच्या व्यक्तींकडून साथ मिळाली नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या स्पर्धकावर होतो. असंच काहीसं सध्या ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडेसोबत घडताना दिसतंय. अंकिताने ऑक्टोबर महिन्यात पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. तेव्हापासून या दोघांमध्ये सतत विविध कारणांवरून वाद होताना दिसतंय. पतीसोबतचे वाद असतानाच अंकिताची सासू म्हणजेच विकी आईसुद्धा तिच्याविरोधात वक्तव्ये करताना दिसतेय. या सर्वांचा परिणाम अंकितावर झाला असून येत्या एपिसोडमध्ये ती विकीसोबत ब्रेक घेण्याविषयी बोलताना दिसते.

बिग बॉसचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये अंकिताच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसून येतेय. मला कोणीच समजून घेत नाही, असं ती पती विकीला म्हणतेय. पण जेव्हा विकी तिच्याबद्दल तक्रारी करू लागतो, तेव्हा अंकिता एकमेकांपासून ब्रेक घेण्याचं वक्तव्य करते. या प्रोमोमध्ये विकी आणि अंकिता गार्डन एरियामध्ये एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. नेमकं काय झालंय, असा प्रश्न विकी अंकिताला विचारतो. तेव्हा ती त्याला त्यांच्या नात्याबद्दल विचार करत असल्याचं सांगते. कोण काय विचार करतं याने मला फरक पडत नाही, असं विकी तिला समजावून सांगतो. पण इतरांच्या मताचा खूप परिणाम होत असल्याचं ती स्पष्ट करते.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

“मी सर्वांवर खूप प्रेम करते आणि जर त्यावरून कोणी प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याचा परिणाम माझ्यावर होणारच. मला कोणीच नीट समजू शकत नाहीये असं वाटतंय. मी दिवसागणिक आणखी चिडतेय”, असं अंकिता म्हणते. यानंतर विकी त्याला तिच्याबद्दल न आवडणाऱ्या गोष्टींची यादीच वाचून दाखवू लागतो. हे ऐकून अंकिता विकीला म्हणते, “तुला ब्रेक हवाय का?” अंकिता असं का म्हणतेय हे विकीला समजत नाही आणि या प्रोमोच्या शेवटी विकीचा आश्चर्यकारक चेहरा दिसतो.

बिग बॉसनंतर घटस्फोट?

हा शो संपल्यानंतर अंकिता आणि विकी विभक्त होतील की काय, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे. बिग बॉसच्या घरात विकीला अंकितावर हात उचलतानाही पाहिलं गेलं. तर अंकिताही विकीला लाथ मारताना, चप्पल फेकताना दिसली. फॅमिली वीकदरम्यान जेव्हा विकीची आई बिग बॉसच्या घरात आली, तेव्हा दोघांमधील गोष्टी आणखी विकोपाला पोहोचल्या. अंकिताला विकीला लाथ मारताना पाहून तिच्या आईला लगेच कॉल केल्याचं सासूने सांगितलं. त्यावरून अंकिता आणि तिच्या सासूमध्ये बाचाबाची झाली. इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अंकिताच्या सासूने विविध मुलाखतींमध्ये तिच्याविषयी बरीचे काही वक्तव्ये केली आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.