अंकिता लोखंडे, विकी जैनचे नाते एकदम घट्ट, ‘मणिकर्णिका’ म्हणते दीपिका पादुकोण सारखे सीन करायला नवऱ्याची परवानगी ?
"माझ्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर तुम्हाला समजेल की, मी असा एकही प्रोजेक्ट केलेला नाही. जो जास्त स्कीन दाखवेल. त्यामुळे मी एकदा प्रोजेक्ट निवडताना नेहमीच काळजी घेते. त्यामुळे माझी निवड वेगळी असते. मला असे वाटते की मी असे सीन्स करू शकत नाही.
मुंबई – ‘पवित्र रिश्ता 2’ (Pavitra Rishta) अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तिचा अनेक वर्षाचा प्रियकर विकी जैन (Vicky Jain) याच्याशी गेल्या वर्षी डिसेंबर 2021 लग्न केले. ‘मणिकर्णिका’ (Manikarnika) अभिनेत्रीचे असे मत आहे की, विकी जैनसोबत लग्न केल्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणताही बदल झाला नाही. मात्र, दोघांचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाले आहे. आताही दोघांचा एकमेकांवर मित्रासारखा विश्वास आहे. सध्या दीपिका पदुकोण तिच्या ‘गहरियान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीर सिंगसोबत लग्न केल्यानंतर दीपिका पदुकोणने या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदूसोबत बोल्ड सीन्स दिले आहेत. अशा परिस्थितीत, असे मानले जाते की आता इंडस्ट्रीतील लोक खूप बोल्ड झाले आहेत आणि काळाबरोबर सर्वकाही बदलत आहे.
अंकिता लोखंडेचं म्हणणं आहे की, तिचा पती विकी जैन देखील तिला लग्नानंतर बोल्ड सीन करण्यापासून कधीच रोखणार नाही. अंकिता लोखंडेला असे सीन करायला आवडणार नाही. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने अनेक गोष्टींची पोलखोल केली, बोल्ड सीन करण्यास मी समर्थ नाही तसेच अशा प्रोजेक्टला ती डोक्यात घेत नाही. तसेच आत्तापर्यंत मी माझ्या वाटेला आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच माझा नवरा विकी जैन अगदी ओपन माईंडवाला आहे. त्यामुळे मला असे सीन करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
प्रोजेक्टबाबत अंकिताचं मतं
“माझ्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर तुम्हाला समजेल की, मी असा एकही प्रोजेक्ट केलेला नाही. जो जास्त स्कीन दाखवेल. त्यामुळे मी एकदा प्रोजेक्ट निवडताना नेहमीच काळजी घेते. त्यामुळे माझी निवड वेगळी असते. मला असे वाटते की मी असे सीन्स करू शकत नाही. त्याचबरोबर लग्नानंतर मला फक्त माझ्याबद्दलच वाटत नाही. विकीलाही स्वतःमध्ये अनेक अडथळे जाणवतात. त्यालाही नको असेल तर मी असे प्रोजेक्ट कधीचं करणार नाही. त्याच्या भावनांचीही मी काळजी घेते. मला वाटत नाही की बोल्ड सीन्सच्या प्रोजेक्ट्सबाबत आमच्यामध्ये कधीच काही अडचण असेल. बरं, माझ्यात अशी एक व्यक्ती आहे जिला बोल्ड सीन करायला आवडणार नाही. ”
अंकिताचं नव-याबाबत मतं
तिचा नवरा विकी जैन हा खूप शांत माणूस आहे, तो खूप मस्तही आहे. अशा परिस्थितीत तो अंकिताला असे प्रोजेक्ट करण्यापासून कधीच रोखणार नाही. तो म्हणतो की, “मी हे स्पष्ट करतो की जर माझ्याकडे असे बोल्ड सीन आले, तर मी खूप मोकळेपणाने ते स्वीकारेल. हे मी माझ्या बाजूने सांगत आहे. मला त्याला अजिबात दुखवायचे नाही. मी त्याला पुर्णपणे समजू शकते कारण त्याने माझ्याशी लग्न केले आहे. त्यांने त्याच्या जे मनात आहे ते तोंडावर बोलावे त्यामुळे मला काहीच फरक पडणार नाही. परंतु मनात नसताना माझ्याकडे पाहून हा बोललेलं मला आवडणार नाही.