सूरज नेहमी म्हणायचा…. अखेर अंकिता असं काय बोलून गेली?
बिगबॉस संपल्यावर सूजरला अंकिता वालावलकर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन भेटायला गेली होती. तेव्हा "बिग बॉसच्या घरात सूरज नेहमी म्हणायचा आणि ते खरं झालं", असं म्हणत तिने त्या क्षणाचा व्हिडाओ शेअर केला आहे.
‘बिग बॉस मराठी 5’ मुळे घराघरात पोहोचलेला आणि सगळ्यांचा लाडका बनलेला सूरज चव्हाण जो की ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेताही आहे. बिग बॉस नंतर सूरजचे आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. त्याचा चाहता वर्ग अजून वाढला आहे.
अंकिताने शब्द पाळला
बिगबॉस संपल्यावर सूजरला अनेक मंडळी भेटायला आली.सूरजला अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर यांनी भाऊ मानलं होतं. जान्हवीने त्याच्या गावी जाऊन सूरजला भेट दिली होती. अंकितानेही दिलेला शब्द पाळला. अंकिता तिच्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन सूरजला भेटण्यासाठी गेली,. तो व्हिडीओसुद्धा तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अंकिता आणि तिचा होणारा नवरा दोघेही सुरजला भेटायला थेट त्याच्या मळ्यात पोहोचले. अंकिताने एक व्हीडिओ शेअर करत सुरजसोबतची ती भेट शेअर केली आहे. यात सुरज, अंकिता, तिचा होणारा नवरा, सुरजच्या घरातले आणि इतर मंडळी शेतात गप्पा मारताना दिसतायत. तर सुरजची बहीणीने त्या सगळ्यांकरता जेवण बनवून आणलेलंही दिसलं.
‘अखेर सूरज म्हणायचा ते खरं झालं’…अंकिताने बोलून दाखवलं
भाकरी, शेंगदाणा मिरचीची चटणी आणि बटाट्याची कापं असा जेवणाचा बेत दिसत आहे. सगळेचजण हे जेवण आनंदाने खाताना दिसतायत. सुरजच्या गावातल्या मळ्यात ते सगळे बसलेले दिसतायत. तर हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने लिहिलं, ‘बिग बॉस च्या घरात असताना सूरज नेहमी म्हणायचा माझ्या घरी चटणी भाकर खायला येशील … आणि मी “हो” अस म्हटलं की तो म्हणायचा “खरंच… अगं बाया ग“ तर ही होती आमची “अगं बाया ग Moment’.
View this post on Instagram
असं म्हणत अंकिताने व्हिडीओ शेअर करत या भेटीचा आनंद व्यक्त केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. तर यासोबतच शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये अंकिता त्यांच्या गावातल्या मरीआईच्या देवळात दर्शन घेताना दिसत आहेत. तर नेटकरीही त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.