शहाणपणा पाजळू नको, तू तिच्या जागी असती तर… ‘कोकण हार्टेड गर्ल’ला नेटकऱ्यांनी झापलं; कारण काय?
अंकिता वालावलकर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे अंकिता वालावलकर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, अंकिता वालावलकर मोठ्या वादात सापडलीये.
मुंबई : कोकण हार्टेड गर्ल अर्थात सर्वांची आवडती अंकिता वालावलकर सध्या मोठ्या वादात सापडलीये. एक व्हिडीओ शेअर करणे अंकिता वालावलकर हिच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसतंय. लोक अंकिता वालावलकर हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. फक्त व्हिडीओच नाही तर एका कमेंटला उत्तर देताना अंकिता जे काही बोलली ते ऐकून सर्वांच्या मोठा धक्का बसला असून मोठी खळबळ निर्माण झालीये. यामुळेच अंकिता वालावलकर हिच्यावर सर्वस्तरातून टिका केलीये जातंय.
अंकिता वालावलकर ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. अंकिता वालावलकर हिची तगडी फॅन फाॅलोइंग असून ती कायमच सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अंकिता वालावलकर हिने नव्या व्यावसायाला सुरूवात केलीये. त्यासाठी तिला एका मुलीची गरज होती. याबद्दल तिने तिच्या मित्राला सांगितले.
विशेष म्हणजे त्या मित्राने कामासाठी मुलगी देखील शोधली. मात्र, ज्यावेळी त्या मुलीला सांगण्यात आले की, दुकानात दररोज तुला झाडू मारावा लागेल आणि देवाची पूजा वगैरे करावी लागेल हे ऐकून त्या मुलीने कामाला नकार दिल्याचे सांगताना व्हिडीओमध्ये अंकिता वालावलकर दिसतंय. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये वास्तव असे लिहिले.
View this post on Instagram
यानंतर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत अंकिता वालावलकर हिचा चांगलाच क्लास लावला. कहर म्हणजे एका कमेंटला उत्तर देत अंकिता वालावलकर थेट म्हणाली की, दहा हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या मुलीने सेल्फ रिस्पेक्टबद्दल बोलू नये…अंकिता वालावलकर हिची ही कमेंट पाहून लोकांचा पारा चांगलाच चढला.
अंकिता वालावलकर हिचा लोकांनी चांगलाच क्लास लावल्याचे बघायला मिळतंय. एकाने कमेंट करत थेट म्हटले की, दहा हजार रूपये कमवणाऱ्या मुलीला सेल्फ रिस्पेक्ट नसतो का?. दुसऱ्याने लिहिले की, अशा कितीतरी महिला आहेत ज्या महिन्याला इतकेच पैसे कमावतात. मग त्यापैकी कोणालाच सेल्फ रिस्पेक्ट नाहीये का? तिसऱ्याने लिहिले की, ही अंकिता वालावलकर डोक्यावर पडलीये.
अजून एकाने लिहिले की, या प्लॅटफॉर्मवर एखाद्याची प्रतिमा खराब करू नकोस. एकाने तर अंकिताला म्हटले की, शहाणपणा पाजळू नको, तू तिच्या जागी असती तर… नेटकऱ्यांच्या टिकेला अंकिता वालावलकर हिला सामोरे जावे लागत आहे. यावर अंकिता थेट म्हणाली, काही मुलींना पाहून हा व्हिडीओ तयार केलाय. अपेक्षेच्या नावाखाली घरी बसू नये. मुळात म्हणजे दुकानात झाडू मारल्याने आत्मसन्मान कमी होत नाही.